---Advertisement---

VIDEO: असा स्पेल पाहिला नसेल! हॅट्रिकही घेतली आणि…

On: बुधवार, सप्टेंबर 21, 2022 8:55 PM
County Championship 2022
---Advertisement---

इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत 21 सप्टेंबर रोजी एसेक्स आणि लंकाशायर यांच्यातील रोमांचक सामना निकाली निघाला. या सामन्यात लंकाशायर संघ 38 धावांनी जिंकला. जॉर्ज बाल्डरसन याने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली आणि लंकाशायरला विजय मिळवून दिला. बाल्डरसनने या सामन्यात हॅट्रिक घेतली आणि एसेक्ससाठी सर्वात मोठी बाधा ठरला. शेवटच्या डावात एसेक्सला विजयासाठी अवघ्या 98 धावांची आवश्यकता होती, पण त्यांना हे लक्ष्य गाठता आले नाही. 

जॉर्ज बाल्डरसन (George Balderson) याने या सामन्यात पहिल्या डावात एक, तर दुसऱ्या डावात पाच विकेट्सचा हॉल घेतला. दुसऱ्या डावात त्याने एसेक्स संघाची वरची फळी पूर्णपणे उद्वस्त टाकली. त्याने दुसऱ्या डावात घेतेलल्या हॅट्रिकची सर्वात खास गोष्ट हीच होती की, त्याने पहिली शिकार दिग्गज एलेस्टर कुक याची विकेट घेतली. कुक बाल्डरसनच्या जबरदस्त यॉर्करवर क्लीन बोल्ड झाला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 73 शतक ठोकणाऱ्या या दिग्गजाकडे बाल्डरसनच्या या चेंडूला देण्यासाठी कसलेच उत्तर नसल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दुसरी विकेट त्याने डॅन लॉरेंसची घेतली. लॉरेंस फुलटॉस चेंडूवर विलियम्सनच्या हातात झेलबाद झाला. मॅट क्रिचलेला क्लीन बोल्ड करून बाल्डरसनने त्याची हॅट्रिक पूर्ण केली.

बाल्डरसनने हॅट्रिक घेतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान  बाल्डरसनने पहिल्या 2 षटकांमध्येच हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने या दोन षटकांमधील 12 चेंडूंवर एकही धाव खर्च न करता ही कामगिरी केली आहे. बाल्डरसनने या मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. आता या हॅट्रिकमुळे ही मालिका त्याच्या आणि चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे.

https://twitter.com/lancscricket/status/1572553728615665665?s=20&t=UcDG5TaQgsqGIfdQiG5nKg

दरम्यान जॉर्ज बाल्डरसन 21 वर्षांचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा जन्म 11 ऑक्टोबर 2000 मध्ये मॅनचेस्टर शहरात झाला आहे. बाल्डरसन उजव्या हाताने गोलंदाजी करत असला तरी, फलंदाजी मात्र तो उजव्या हाताने करतो. त्याने आतापर्यंत 20 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार देखील राहिला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावार 3 अर्धशतकांची नोंद आहे. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये बाल्डरसनच्या नावावर एक शतक देखील आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
स्मृतीची कमाल सुरुच! 40 धावांच्या नजाकती खेळीत रचला आणखी एक पराक्रम
युवराज सिंग करणार चाहत्यांचा पाहुणचार! ओखळ नसतानाही दिलीये आलिशान घरात एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---