शनिवारी (१६ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा २७ वा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. बेंगलोरच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला ७ बाद १७३ धावाच करता आल्या आणि बेंगलोरने १६ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील कुलदीप यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली.
प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाची (RCB vs DC) वरची फळी १३ धावांवरच कोलमडली होती. त्यानंतर विराट कोहलीही १२ धावांवर धावबाद झाल्यामुळे सामना बेंगलोरच्या हातून निसटत होता. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत मॅक्सवेलने (Glenn Maxwell) दिल्ली संघावर पलटवार करायला सुरुवात केली. त्यातही त्याने दिल्लीचा फिरकीपटू कुलदीपचा (Kuldeep Yadav) चांगलाच समाचार घेतला.
बेंगलोर संघाच्या डावातील नवव्या षटकात मॅक्सवेलने कुलदीपला चारही दिशांना फटके मारले आणि २३ धावा चोपल्या. या षटकातील पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार खेचला. त्यानंतर २ धावा काढल्या. पुढे सलग षटकार, चौकार आणि षटकार खेचला व शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत एका षटकात २३ धावा (Maxwell Concede 23 Runs In Kuldeep Over) काढल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
परंतु त्यांच्यातील संघर्ष येथेच संपला नाही. पुढे कुलदीपने मॅक्सवेलचा हिशोब बरोबर केला. पुढे डावातील १२ वे षटक टाकायला आला असताना कुलदीपने दुसऱ्याच चेंडूवर ललित यादवच्या हातून मॅक्सवेलला झेलबाद केले. चाहते मात्र कुलदीप आणि मॅक्सवेलमधील या लढतीला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवताना दिसत आहेत.
https://twitter.com/MohitKu38157375/status/1515360606253350922?s=20&t=u8j-vvwQ7lCvdAkvtYcPPQ
मॅक्सवेल ३४ चेंडूंमध्ये झंझावातील ५५ धावांची खेळी बाद झाला. त्याने या खेळीदरम्यान २ षटकार आणि ७ चौकार मारले. हे त्याचे आयपीएलच्या चालू हंगामातील पहिलेच अर्धशतक आहे. आपल्या लग्न सोहळ्यामुळे मॅक्सवेल आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकला होता. दुसरीकडे कुलदीपला या सामन्यात प्रभावी प्रदर्शन करता आले नाही. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४६ धावा खर्च केल्या आणि केवळ एकच विकेट घेऊ शकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| गुजरात वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!