रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल रविवारी (३ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध चांगल्या लयीत खेळताना दिसला. त्याने शारजामध्ये ५७ धावांची दमदार खेळी खेळली. बेंगलोरने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १६४ धावा केल्या आणि पंजाबला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. पंजाब संघाने जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ६ धावांनी पराभव पत्करावा लागला.
मॅक्सवेलने ३३ चेंडूंच्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याच्याशिवाय युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने ४० धावांचे योगदान दिले. पंजाबसाठी मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात ३ विकेट घेतल्या तर हेन्रिक्सलाही ३ विकेट्स मिळाल्या. या सामन्यादरम्यान मॅक्सवेलने मारलेला षटकार सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅक्सवेलने फिरकीपटू रवी बिष्णोईला ९७ मीटरचा लांब षटकार मारला. मॅक्सवेलने डावाच्या १५ व्या षटकात सलग दोन षटकार ठोकले. बिश्नोईच्या या षटकाचा दुसरा चेंडू मॅक्सवेलने डीप मिड-विकेटवर खेळला तो थेट स्टेडियमबाहेरील रस्त्यावर जाऊन पडला. त्याच्या पुढच्या चेंडूवर त्याने लाँग ऑनवर षटकार ठोकला.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाला झटपट सुरुवात करून दिली आणि ९.३ षटकांत त्यांनी ६८ धावा जोडल्या. मात्र हेन्रिक्सने डावाच्या १० व्या षटकात ही भागीदारी तोडली. त्याने चौथ्या चेंडूवर विराट कोहलीला (२५) त्रिफळाचीत केले आणि त्यानंतरच्याच चेंडूवर डॅनियल ख्रिश्चयनला (०) सरफराज खान करावी झेलबाद केले.
त्यानंतर मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सने चौथ्या गड्यासाठी ७३ धावा जोडल्या. एबी डिव्हिलियर्स २३ धावावर खेळत असताना सरफराज खानने त्याला धावबाद केले. त्याने १८ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार ठोकले. डावाच्या शेवटच्या षटकात शमीने पुन्हा अप्रतिम कामगिरी करत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शमीने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलला सरफराज खान करवी झेलबाद केले.
चौथ्या चेंडूवर शाहबाज अहमद (८) त्रिफळाचीत झाला आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने जॉर्ज गार्टन (०) यालाही त्रिफळाचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारी ना! पराभवानंतरही मुंबईकडून सुर्यकुमार आणि नॅथन कुल्टर-नाईलचा सन्मान, पाहा व्हिडिओ
ऑसी क्रिकेटरने स्म्रीती मंधनाचा बाउंड्री लाईनजवळ डाईव्ह मारत पकडला अद्भुत झेल, व्हिडिओ व्हायरल
Video: बाद असूनही पडिक्कलला तिसऱ्या पंचांनी ठरवले नाबाद; राहुलचा चढला पारा