---Advertisement---

प्रफुल हिंगेच्या आयपीएलमधील ऐतिहासिक कामगिरीच्या यशामध्ये वरुण ऍरॉनबरोबर मॅकग्रांचेही योगदान, वाचा सविस्तर

On: बुधवार, एप्रिल 15, 2026 2:35 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी (१३ एप्रिल) रात्री उशिरापर्यंत सर्वांना माहित झाले की प्रफुल हिंगे कोण आहे ते. त्याने आपल्या आयपीएल पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेण्याची विक्रमी कामगिरी केली. त्यामुळे सर्वच जणांना त्याच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्यापही न खेळलेल्या वेगवान गोलंदाज प्रफुलने सनरायझर्स हैद्राबादकडून पदार्पण केले आणि ३४ धावांमध्ये ४ विकेट्स घेण्याची कामगिरी नोंदवली. त्याने ही कामगिरी राजस्थान रॉयल्सविरुद्ध केली. तसेच त्याने सामन्यानंतर त्याला दुखापतीमधून सावरण्यासाठी मदत केलेल्या एमआरएफ पेस फाउंडेशनचे आभार मानले. तो पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चर दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होता. तो सामन्यानंतर म्हणाला, माझी खूप चांगली काळजी घेतल्याबद्दल मला एमआरएफचे आभार मानायचे आहे.

नागपूरचा असलेल्या प्रफुलला या फाउंडेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांचे मार्गदर्शन लाभले. मॅकग्रा हे संचालक असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनीच प्रफुलला मार्गदर्शन दिल्याने तो ही त्याच्या चेंडू टाकण्याच्या शैलीत चांगलाच यशस्वी झालेला दिसला.

प्रफुलच्या अचूक टप्पा आणि दिशा राखून नव्या चेंडूला वेगाने स्विंह करण्याच्या या पद्धतीवरून दिसते. पेस फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक एम सेंथिलनाथन माध्यमांशी बोलताना म्हणाले, “प्रफुलच्या फिटनेस आणि एका तांत्रिक त्रुटीवर काम केल्याने त्याच्या प्रगतीला सुरूवात झाली. नव्या चेंडूने त्याचा आखूड टप्पा खूप पक्का आहे, हे आम्ही आणि ग्लेनने पाहिले. त्याच्या चेंडूला थोडे वळण मिळते. आम्ही त्याला २०२३ मध्ये निवडले आणि तो आमच्याकडे आला तेव्हा त्याला पाठीचा त्रास होता. यामुळे आम्ही सर्वात पहिले त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले.”

प्रफुलने त्यावर्षीच्या अंडर-२३ हंगामात चांगली कामगिरी केली. २०२४ मध्येही त्याने त्याच्या कामगिरीत सातत्य राखले आणि त्याची रणजी ट्रॉफीसाठी विदर्भाच्या संघात निवड झाली. तो आता एक आघाडीचा क्रिकेटपटू आहे, असेही सेंथिलनाथन यांनी पुढे सांगितले आहे.

मॅकग्रा यांनी प्रफुलला योग्य ठिकाणी गोलंदाजी करण्याचे आणि दबाव हाताळण्याचे महत्व समजावून सांगितले, असेही तमिळनाडूचे माजी क्रिकेटपटू सेंथिलनाथन यांनी नमूद केले आहे. प्रफुलने आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यासाठी सनरायझर्स हैद्राबादचे गोलंदाजी प्रशिक्षक वरुण ऍरॉन याच्याकडूनही गोलंदाजीचे अधिक प्रशिक्षण घेतले. तसेच ऍरॉनच्या पाठिंब्यामुळेच तो हैद्राबादच्या फ्रॅंचायजीसोबत जोडला गेला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---