---Advertisement---

‘ही’ बीसीसीआयच्या कानाखाली चपराक असेल! शाहिद आफ्रिदीच्या बेताल वक्तव्याने भारतात खळबळ

On: रविवार, मे 21, 2023 12:02 PM
Shahid afridi
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार शाहिद आफ्रिदी याने नुकतेच एक मोठे विधान केले. पाकिस्तान आणि भारतीय संघ मागच्या काही महिन्यांपासून आशिया चषकाच्या वादाता व्यस्त आहेत. भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नाही, तर पाकिस्तान देखील वनडे विश्वचषकासाठी भारताचा दौरा करणार नाही, असे पीसीबीचे म्हणणे आहे. अशातच आफ्रिदीची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. आफ्रिदीच्या मते पाकिस्तानने कोणतेही कारण न सांगता भारताचा दौरा केला पाहिजे आणि विश्वचषक जिंकला पाहिजे.

शाहिन आफ्रिदी (Shahid Afridi) पाकिस्तानच्या महान कर्णधारांपैकी एक राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने अनेक महत्वाच्या मालिका खेळल्या आणि जिंकल्या आहेत. संघासोबत दीर्घकाळ काम केल्यामुळे आफ्रिदीला खेळाडूंच्या अडचणी आणि संघाच्या गरजा चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. अशात भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांमधील वादावर त्याने स्पष्ट मत व्यक्त केले. शाहिद आफ्रिदीच्या मते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम याच्या नेतृत्वातील संघाला भारतात जाऊन वनडे विश्वचषक खेळण्याची परवानगी दिली पाहिजे. आफ्रिदीला असेही वाटते की, भारतात जाऊन पाकिस्तानने विश्वचषक झिंकला, तर ही बीसीसीआयच्या कानाखाली चपराक असेल.

माध्यमांतील वृत्तांनुसार शाहिद आफ्रिदी म्हणाला, “मला समजत नाहीये की, ते (पीसीबी) एवढा कठोर निर्णय का घेत आहेत. त्यांनी गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की, ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. खेळाडूंना जा आणि ट्रॉफी जिंकून या, असे म्हटले गेले पाहिजे. संपूर्ण देश तुमच्या मागे आहे. हा आपल्यासाठी फक्त एक विजय नसेल तर बीसीसीआयच्या कानाखाली चपराक असेल.”

सध्यास्थितीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अडचणीत असल्याचे दिसते. बीसीसीआय खेळाडूंची सुरक्षा राजकीय संघर्षामुळे पाकिस्तान दौरा करण्यासात नकार देत आहे. अशात आगामी आशिया चषका पूर्णपणे हायब्रीड मॉडेलवर खेळवला जाण्याची शक्यता आहे. या मॉडेलनुसार भारताचे सर्व सामने पाकिस्तानच्या बाहेर आयोजित केले जाणार आहेत. तरीदेखील भारतीय संघाने हा प्रस्तान मान्य केला नाही, तर पाकिस्तान वनडे विश्वचषकाविषयी कठोर निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. शाहिन आफ्रिदीच्या मते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे जास्त मार्ग नाहीत. त्यामुळे सो योग्य आणि आपल्या आवाक्यात आहे, असाच निर्णय बोर्डाने घेतला पाहिजे. (Go to India and win the World Cup, Shahid Afridi’s big statement)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईसाठी ‘करो वा मरो’ सामना! वानखेडेत हैदराबादला देणार टक्कर, ‘अशी’ असू शकते संभावित प्लेइंग इलेव्हन
नवीनच्या ओव्हरमध्ये रिंकूचे तांडव! ठोकला थेट 110 मीटर लांबीचा सिक्स, गोलंदाजाने रडल्यासारखं केलं तोंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---