भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेबाबत आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
यापूर्वी बीसीसीआय आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबत चर्चा केली होती. मात्र या चर्चेअंती कसोटी मालिकेतील सामने बंद दाराआडच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता गृहमंत्रालयाने जरी केलेल्या नवीन दिशानिर्देशांनुसार प्रेक्षकांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन दुसऱ्या सामन्यासाठी पन्नास टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती देण्याच्या विचारात आहेत. यासंदर्भात परवानगी देण्याची मागणीही त्यांनी बीसीसीआयकडे केले असल्याचे समजते. सोमवारी होणाऱ्या बीसीआयच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की “पाच फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत प्रेक्षकांना प्रवेश देणे शक्य नाही. कारण शनिवारी अधिसूचना प्राप्त झाल्याने आता हा निर्णय घेण्यसाठी पुरेसा वेळ उपलब्ध नाही. मात्र १३ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटीत प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ शकतो.”
दरम्यान, चेपॉकच्या मैदानाची आसनक्षमता सुमारे ५०,००० प्रेक्षकांची असून पन्नास टक्के प्रेक्षकांना म्हणजेच २५,००० प्रेक्षकांना दुसऱ्या कसोटी सामन्याचा प्रत्यक्ष मैदानात जाऊन आनंद लुटता येईल. मात्र त्यासाठी बीसीसीआयच्या मंजुरीची वाट पहिली जाते आहे.
महत्वाच्या बातम्या:
स्मिथ, कोहली आणि विलियम्सन या तीन खेळडूंशी होणाऱ्या तुलनेबाबत जो रुटने दिली मोठी प्रतिक्रिया
खराब फॉर्मातून सावरण्यासाठी ही गोष्ट करतो, कुलदीप यादवने केला उलगडा
आता या स्पर्धेत खेळणार अर्जुन तेंडुलकर, झाला मुंबई संघात समावेश