fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कबड्डीप्रेमी आहात? तर ही आहे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी

सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व क्रीडा स्पर्धा बंद आहेत. कबड्डी सामने ही बंद आहेत.

स्टार स्पोर्ट्स सध्या क्रिकेटचे जुने सामने टीव्हीवर दाखवत आहेत. मागच्या आठवड्यापासून क्रिकेट सामने दाखवले जात आहेत. आता कबड्डी चाहत्यांसाठी देखील जुने सामने बघण्याची पर्वणी मिळणार आहे. उद्या ११ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान रोज सकाळी १०:३० वाजता काही सामने दाखवले जाणार आहेत.

कबड्डी विश्वचषक २०१६ मधील विजेत्या भारतीय कबड्डी संघाचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. तसेच टोटल कबड्डी हिरोज, नवीन एक्सप्रेसने गाजवलेली प्रो कबड्डी सिजन ७ मधील टॉप मॅच दाखवणार आहेत. हे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स २ व स्टार स्पोर्ट्स ३ वर दाखवण्यात येणार आहेत.

महत्त्वाचे लेख- 

इंग्लंडमध्ये इंग्लंडला धोबीपछाड देणार ३ महान भारतीय कर्णधार

दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकणारे ३ भारतीय कर्णधार

न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये पाणी पाजणारे ३ भारतीय कर्णधार

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला नडणारे ४ भारतीय कर्णधार

You might also like