सध्या सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांमधून फक्त विजेतेपदच नव्हे तर आशियायी तसेच ऑलिम्पिक खेळाचे ध्येय खेळाडूंनी डोळ्यासमोर ठेवावे, अशी अपेक्षा क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
सात ब्लॉक खो-खो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने कोद्रे फार्म, धायरी येथे आयोजित ‘खो-खो’ स्पर्धेस क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आधार सोशल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चाकणकर, भारतीय असोसिएशनचे महासरचिटणीस बी. आर. यादव, ऑल इंडिया 7 ब्लॉक खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, सावित्री सन्मान फाउंडेशनच्या सेक्रेटरी सोनल कोद्रे, शीतल संतोष चाकणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान उपस्थित होते.
क्रीडा राज्यमंत्री तटकरे पुढे म्हणाल्या, प्रत्येक क्रीडा संकुलामध्ये भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांब या खेळांच्या सुविधा असाव्यात. कोरोनाच्या कठीण काळातही या स्पर्धाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी 7 ब्लॉक खो-खो संघटना महाराष्ट्र तसेच आधार सोशल ट्रस्टचे अभिनंदन केले. त्यानंतर या स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंची भेट घेऊन प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्पर्धेसाठी आंध्रप्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडीसा व उत्तरप्रदेश या आठ राज्यातून आलेले खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.