भारतीय क्रिकेट संघ सध्या आगामी टी२० विश्वचषक २०२२च्या तयारीला लागला आहे. भारतीय टी२० संघाकडून अनुभवी दिनेश कार्तिक आपली चमक दाखवताना दिसत आहे. आयपीएल २०२२मधील धडाकेबाज प्रदर्शनानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने भारतीय संघाच्या पहिल्यावहिल्या टी२० सामन्याची आठवण काढताना कार्तिकबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
स्मिथने (Graeme Smith) भारतीय संघाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याच्या (Team India’s First T20I) आठवणींना उजाळा दिला आहे. भारतीय संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता. या सामन्यात कार्तिक दक्षिण आफ्रिका संघाच्या पराभवाचे कारण ठरला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हातात असलेला सामना त्यांच्यापासून दूर नेला होता. या सामन्यावेळी स्मिथ दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार होता. कार्तिकने (Dinesh Karthik) या सामन्यात आपल्या संघाला दिलेल्या कटू आठवणींना तो आजही विसरलेला नाही.
एका यूट्यूब चॅनलवर बोलताना स्मिथ या सामन्याला आठवत म्हणाला की, “कार्तिकच्या त्या सामन्यातील खेळीमुळे माझ्यासाठी या सामन्याबद्दल खास आठवणी नाहीत. कार्तिक धावा करत होता आणि भारतीय संघाने तो सामना जिंकला होता. त्यामुळे माझ्यासाठी या सामन्याबद्दल कसल्याची आठवणी नाहीत.”
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने १२६ धावा केल्या होत्या. या डावात दक्षिण आफ्रिकेकडून ऍल्बी मॉर्केलने सर्वाधिक २७ धावा केल्या होत्या. तसेच जस्टीन केम्पने २२ धावांचे योगदान दिले होते. कर्णधार स्मिथ या सामन्यात १६ धावांवर बाद झाला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने कार्तिकच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर सामना जिंकला होता. कार्तिकने २८ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा केल्या होत्या. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
महत्त्वाचे म्हणजे, या सामन्यात खेळलेले सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. मात्र एकटा कार्तिक अजूनही भारताकडून क्रिकेट खेळत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कार्तिकच्या नावाची चाहत्यांकडून नारेबाजी, फिल्डिंग करत असलेल्या मुरली विजयने थेट जोडले हात
टीम इंडियाला मिळाला आणखी एक नवा कोच! टी२० वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने कसली कंबर