इंग्लंड विरुद्ध भारत संघात येत्या ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या मालिकेबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटू विविध प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत. नुकतेच इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वान यांनी देखील या मालिकेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
स्वान यांनी या मालिकेच्या निकालाचा अंदाज वर्तवला आहे. ज्यात भारतीय संघ विजयाचा दावेदार असल्याचे सांगितले आहे.
स्वान यांनी स्पोर्ट्सकीडाच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, इंग्लंड संघाने ज्याप्रकारे २०१८ मध्ये भारतावर विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे आता भारतावर विजय मिळवणे खूपच अवघड आहे. कारण सध्या इंग्लंड संघाकडे मोठी धावसंख्या उभी करणारे फलंदाज नाहीत आणि फिरकीपटू देखील नाहीत, जे विरुद्ध संघाच्या फलंदाजांना त्रास देतील.
स्वान म्हणाले की,“या कसोटी मालिकेत एका सामन्यादरम्यान पाऊस पडेल आणि चार सामन्यांचे निकाल लागतील. फलंदाजीच्या बाबतीत भारतीय संघ मजबूत आहे, पण गोलंदाजीच्या बाबतीत दोन्ही संघ समान आहेत. त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की, भारत ३-१ मालिका जिंकेल किंवा २-२ अशी मालिका बरोबरीत होऊ शकते.”
इंग्लंड संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीबद्दल बोलताना स्वान म्हणाले की, “इंग्लंडचे फिरकीपटू खूपच कमकुवत आहे आणि उन्हाळ्यानंतर फिरकीपटूंचा चांगला वापर करता येऊ शकतो. खेळपट्टीवर जास्त गवत नसल्यास फिरकीपटूला विकेट मिळू शकतील. भारत ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकू शकेल.”
त्याचबरोबर स्वान कसोटी क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपाबद्दल बोलताना म्हणाले की, “मला हे सांगण्यात आनंद होत नाही, पण भारतीय संघ खूप चांगला आहे आणि न्यूझीलंड संघाने देखील इंग्लंड संघाला कसोटी मालिकेत हरवले होते. मला वाटत नाही की, इंग्लंड संघ आपली फलंदाजी सुधारेपर्यंत चांगली कामगिरी करू शकेल.”
भारत आणि इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना ४ ऑगस्ट पासून नॉटिंघम येथे सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघातील ‘या’ ३ दिग्गज खेळाडूंसाठी इंग्लंड दौरा ठरु शकतो अखेरचा
जोकोविचच्या संयमाचा फुटला बांध, रागाच्या भरात तोडले रॅकेट; व्हिडिओ होतोय व्हायरल