---Advertisement---

वाटलं नव्हत सिराज अशी गोलंदाजी करेल, रुटला चांगलं फसवलं; इंग्लिश दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने

Mohammad-Siraj
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा (०५ मार्च) दिवस आहे. अशातच पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंड संघाला २०५ धावांवर गारद पाडले. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्यामुळे मोहम्मद सिराजला संघात संधी देण्यात आली. या संधीचे त्याने सोने केले. अशातच इंग्लंड संघाच्या माजी गोलंदाजाने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिराजने मालिकेत सर्वाधिक १३ गडी बाद केले होते. अशातच नुकत्याच सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात सिराजने पहिल्या डावात २ गडी बाद केले. यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा देखील समावेश आहे. अशातच माजी इंग्लिश गोलंदाज ग्रिम स्वानने सिराजचे कौतुक केले आहे.

वाटले नव्हते सिराज या गोष्टीचा फायदा घेणार
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा डाव २०५ धावांवर आटोपल्यानंतर स्वान म्हणाला, “जेव्हा इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकली, तेव्हा मी विचार केला होता की या खेळपट्टीवर चेंडू इकडे तिकडे होणार. कारण मैदानावर थोडा ओलावा होता. मला अपेक्षा नव्हती की सिराज इतकी चांगली गोलंदाजी करेल. मला वाटले होते की, ईशांत शर्मा वरिष्ठ गोलंदाज असल्यामुळे त्याला फायदा घेता येईल. परंतु सिराजने तर कमालच केली.”

रूटला बाद करण्याबाबत स्वान म्हणाला
मोहम्मद सिराजने कर्णधार रुटला अवघ्या ५ धावांवर माघारी पाठवले. यावर स्वान म्हणाला, “त्याने उत्कृष्ट वेगवान गोलंदाजी केली आणि ज्याप्रकारे त्याने ऑफ स्टंपच्या जवळ गोलंदाजी करत रूटला बाद केले ते कौतुकास्पद आहे. ड्रिंक्सनंतर त्याने आत येणाऱ्या चेंडूवर जो रूटला बाद केले.”

जॉनी बेयरस्टोला बाद करण्याबाबत स्वान म्हणाला
“ज्या चेंडूवर त्याने जॉनी बेयरस्टोला बाद केले. त्या चेंडूची विशेष गोष्ट म्हणजे, त्या चेंडूची गती मागच्या केलेल्या चेंडुपेक्षा १० किलोमीटर प्रतितासाने अधिक होती. त्याला वेगाने बाद करत माघारी धाडले. हे त्याच्या गोलंदाजीचे छोटे वैशिष्ट होते. तुम्ही या गोलंदाजाला सलाम केला पाहिजे,” असे स्वानने शेवटी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

PSL 2021: नाश्ता म्हणून सडलेले अंडे आणि पाव दिले जातात; इंग्लिश खेळाडूकडून पोलखोल

दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय, आता ‘हे’ खेळाडू सांभाळणार कसोटी, वनडे आणि टी२० संघांचे कर्णधारपद

राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, मोहम्मद सिराजने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---