---Advertisement---

क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! पुढील ८ वर्षात आयसीसीच्या होणार तब्बल २८ स्पर्धा

On: शुक्रवार, एप्रिल 10, 2020 4:11 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटला अधिक उंचीवर पोहोचविण्यासाठी पुढील ८ वर्षांची योजना बनवत आहे. यासाठी आयसीसीला २०२३ ते २०३१दरम्यान २८ स्पर्धांचे आयोजन करायचे आहे. आयसीसीकडून या स्पर्धा आयोजित करण्यासाठी निविदाकारांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात काही प्रगती झाली आहे.

सहयोगी देशांसह सर्व ९३ सदस्य मंडळाकडून आठ वर्षांत होणा २८ स्पर्धांसाठी ऑफर मिळाल्या आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारत (India), इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या देशांनाही याचे उत्तर दिले आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एकूण १८ सदस्यांनी आयसीसीच्या या प्रस्तावाला प्रतिसाद दिला आहे. आयसीसीच्या या प्रस्तावानुसार २०२३पासून २०३१ पर्यंत दर वर्षी एका विश्वचषकाचे आयोजन करायचे आहे.

यामध्ये आणखी २ विश्वचषकाचा समावेश आहे. ज्यात २०२४ आणि २०२८मध्ये १० राष्ट्रांच्या टी२० चँपियनशिपचा (T20 Championship) समावेश आहे.

आयसीसीच्या या वेळापत्रकाचा परिणाम बीसीसीआयच्या द्विपक्षीय मालिकेवर होईल. ज्यासाठी सध्याच्या बीसीसीआयकडे (BCCI) एका सामन्यासाठी ६० कोटी रुपयांचे मीडिया अधिकार आहे. सध्या या प्रकरणावर बीसीसीआय आणि आयसीसीलाही चर्चा करायची नाही.

यावेळी बीसीसीआयने लिहिले की, “आयसीसी (ICC) स्पर्धांच्या वाढीचा द्विपक्षीय क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. म्हणूनच सर्व बाबींवर चर्चा करुन त्यांचे विश्लेषण केले पाहिजे.” 

पुरुषांच्या आठ स्पर्धांव्यतिरिक्त आयसीसी महिलांच्या स्पर्धेसाठी बोली लावणारेदेखील शोधत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल प्रत्येक पर्यायी वर्षात होते. त्याचप्रमाणे १९ वर्षांखालील विश्वचषकाचे (Under 19 World Cup) आयोजन दर दोन वर्षांनी होते.

सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच यावर्षाच्या शेवटी होणारा आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषक वेळापत्रकानुसार होतो की नाही याची आयसीसी वाट पाहत आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-कार घेऊन भारतीय क्रिकेटपटू थेट बाजारात, पोलीसांनी फाडलं चलन

-रमीज राजा व शोएब मलिकमध्ये ट्विटरवर जोरदार भांडणं

-इंग्लंडमध्ये इंग्लंडला धोबीपछाड देणार ३ महान भारतीय कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---