जागतिक क्रिकेटमधील चपळ कर्णधारांमध्ये भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंग धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेत पाहायला मिळाला. धोनी मॅजिकपुढे विरोधी संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या हादेखील चारी मुंड्या चीत झाला. हार्दिक महत्त्वाच्या सामन्यात फक्त 8 धावांवर तंबूत परतला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती.
झाले असे की, चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) संघ पहिल्या क्वालिफायर सामन्यात आमने-सामने होते. यावेळी चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने पाच षटकाचां खेळ खेळला होता. यावेळी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि शुबमन गिल (Shubman Gill) गुजरातचा डाव सावरत होते. अशात कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने सहाव्या षटकात आपली चपळाई दाखवली आणि चेंडू महीश थीक्षणा याच्याकडे सोपवला. थीक्षणाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आणि षटकातील पाचव्या चेंडूवर पंड्याच्या डावाचा शेवट केला. विशेष म्हणजे, हार्दिक ज्या चेंडूवर बाद झाला, त्याच्या एक चेंडू आधीच धोनीने लेग साईडहून क्षेत्ररक्षकाला हटवून त्याच जागी उभे केले होते, जिथे पंड्याने झेल सोपवला. हार्दिक यावेळी 7 चेंडूंचा सामना करत 8 धावांवर तंबूत परतला.
👀 Dhoni moved a fielder to the off-side a ball prior to Hardik getting dismissed! #GTvCSK #TATAIPL #Qualifier1 #IPLonJioCinema pic.twitter.com/oJow2Vp2rj
— JioCinema (@JioCinema) May 23, 2023
बॅटमधून फ्लॉप ठरला धोनी
या सामन्यात अंबाती रायुडू बाद झाल्यानंतर एमएस धोनी मैदानावर आला होता. यावेळी धोनीने मैदानात पाऊल ठेवताच, धोनी-धोनी नावाचा गजर झाला. मात्र, धोनी चाहत्यांना खुश करू शकला नाही. त्याने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोहित शर्मा याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मोहितच्या धिम्या चेंडूवर धोनीने फटका मारला असता, तो हार्दिक पंड्या याने पकडला. यावेळी धोनी फक्त 1 धाव करून तंबूत परतला.
ऋतुराजची वादळी खेळी
ऋतुराजची बॅट पुन्हा एकदा तळपली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून ऋतुराजने चौथे अर्धशतक झळकावले. त्याने 36 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याने सामन्यात एकूण 44 चेंडूत 136च्या स्ट्राईक रेटने 60 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. तसेच, डेवॉन कॉनवे यानेही 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तसेच, रवींद्र जडेजा यानेही 16 चेंडूत 22 धावांची खेळी साकारली. या जोरावर चेन्नईने 20 षटकात 7 विकेट 172 धावा केल्या होत्या. (gt skipper hardik pandya gets out on captain ms dhoni masterplan in csk vs gt 1st qualifier of ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘खरा मित्र सुखासोबतच दुःखातही…’, सिडनीतील सभेत नरेंद्र मोदींनी काढली शेन वॉर्नची आठवण
पहिल्या Qualifierमध्ये चमकली ऋतुराज-कॉनवेची जोडी, 87 धावांच्या भागीदारीने घडवला इतिहास, वाचाच