शुक्रवारी (दि. 12 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आयपीएल 2023च्या प्ले-ऑफ शर्यतीत कायम राहण्यासाठी मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स संघ 57व्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई विरुद्ध गुजरात संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने जिंकली. यासह त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकत गुजरात संघ प्ले-ऑफमध्ये एन्ट्री करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात गुजरात टायटन्स संघ मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसोबतच मैदानात उतरणार आहे. याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स संघही मागील प्लेइंग इलेव्हनसोबत या सामन्यात खेळणार आहे.
🚨 Toss Updates 🚨@gujarat_titans win the toss and elect to field first against @mipaltan
Follow the Match: https://t.co/o61rmJWtC5#TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/rLNl8FlRhG
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
हंगामातील कामगिरी
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्यांनी मुंबईविरुद्ध भिडण्यापूर्वी 11 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामने खिशात घातले आहे, तर 3 सामन्यात पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ चांगली कामगिरी करत 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. मुंबईने गुजरातविरुद्ध भिडण्यापूर्वी आतापर्यंत 11 सामने खेळून त्यापैकी 6 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभव पत्करला आहे. (Gujarat Titans have won the toss and have opted to field against mumbai indians IPL 2023)
ही बातमी अपडेट होत आहे…
मुंबई आणि गुजरात संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टीम डेविड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय
गुजरात टायटन्स
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑरेंज कॅपसाठी युवा अन् अनुभवी खेळाडूमध्ये काट्याची टक्कर! ‘या’ फलंदाजांमध्ये फक्त 1 धावेचे अंतर
‘मी स्वतःहून कधीच…’, विराटसोबतच्या वादानंतर नवीन उल हकची पहिलीच मुलाखत