आयपीएल 2023 साठी बीसीसीआयने शुक्रवारी (23 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. या लिलावात भारतीय तसेच अनेक विदेशी दिग्गज देखील सहभागी झाले. मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणाऱ्या केन विलियम्सन (Kane Williamson) याला आगामी हंगामासाठी गुजरात याटसन्स (Gujarat Titans) संघाने खरेदी केले. गुजरात याटन्सने विलियम्सनला ताफ्यात सामील करण्यासाठी 2 कोटी रुपये खर्च केले, जी त्याची बेस प्राईज होती. (Gujarat Titans spent 2 crores to buy Kane Williamson)
Opening bid with the Gujarat Titans for Kane Williamson and he is SOLD for INR 2 Crore to Gujarat Titans #IPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
केन विलियम्सन न्यूझीलंडच्या वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने न्यूझीलंड कसोटी संघाचा कर्णधारपद सोडेल. असात येत्या काळात विलियम्सन मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर अधिक लक्ष देताना दिसू शकतो. विलियम्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक दिग्गज फलंदाज तसेक कर्णधार असला, तरी आयपीएलमध्ये मात्र त्याला अद्याप चमक दाखवता आली नाहीये. विलियम्सनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 76 सामने खेळले असून यामध्ये 2101 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र विलियम्सनची आकडेवारी पाहण्यासारखी आहे. त्याने न्यूझीलंड संघासाठी 88 कसोटी सामने खेळले असून 52.63 च्या सरासरीने 7368 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 24 शतके, 4 द्विशतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 158 सामने खेळले असून 6391 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्य विलियम्सनच्या नावाक 87 सामन्यांमध्ये 2464 धांवांची नोंद आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: रिषभ पंतने रनआऊट होण्यापासून वाचवले, तरी विराट भडकला; रिऍक्शन व्हायरल
BANvIND: दुसऱ्या दिवशीच्या सुरूवातीलाच भारताला दोन धक्के, राहुल-गिल स्वस्तात ‘आऊट’