इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २९वा सामना रविवारी (दि. १७ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात गुजरात संघाने शेवटचा एक चेंडू ठेवत ३ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे चेन्नईच्या विजयाच्या आशांना पुन्हा सुरंग लागले. यासह गुजरातने हंगामातील पाचवा विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार डेविड मिलर ठरला.
या सामन्यात गुजरात (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत चेन्नई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी चेन्नईने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १६९ धावा केल्या. चेन्नईचे १७० धावांचे आव्हान गुजरात संघाने १९.५ षटकात ७ विकेट्स गमावत पूर्ण केले.
💙🤩😅
2️⃣ wins in 4️⃣ days! #SeasonOfFirsts #AavaDe #GTvCSK pic.twitter.com/EEQQJz7zJZ
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 17, 2022
गुजरात संघाचा डाव
गुजरातकडून फलंदाजी करताना डेविड मिलरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. या धावा करताना त्याने ६ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त प्रभारी कर्णधार राशिद खानने ४० धावा चोपल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणालाही २० धावांचा आकडा पार करता आला नाही. मात्र, मिलर आणि राशिदच्या खेळीमुळे गुजरातने हा सामना खिशात घातला.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना ड्वेन ब्रावोने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच, महीश तीक्षणाने २ विकेट्स, मुकेश चौधरी आणि कर्णधार रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
ऋतुराजची खेळी व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. विशेष म्हणजे, पहिल्या ५ हंगामात ऋतुराजला खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, गुजरातविरुद्ध त्याने अर्धशतक लगावले. त्याने ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. यामध्ये ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तसेच, अंबाती रायुडूने ४६ धावा चोपल्या. याव्यतिरिक्त रवींद्र जडेजाने २२ आणि शिवम दुबेने १९ धावांचे योगदान दिले. ऋतुराजने अर्धशतक करूनही ते व्यर्थ ठरले.
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना अल्झारी जोसेफने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त यश दयाल आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १ विकेट्स नावावर केली.
या सामन्यात विजय मिळवत गुजरात पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहोचला आहे. गुजरातने ५ विजयांसह १० गुण मिळवले. दुसरीकडे चेन्नई संघ २ गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडूलकरनंतर आयपीएलमधील ‘या’ भारी विक्रमावर फक्त ऋतुचा ‘राज’, ठरला दुसराच भारतीय
लईच अवघड झालं! धवनच्या प्रायव्हेट पार्टला जोराने लागला चेंडू, काही मिनिटे मैदानावरच लागला लोळू
‘अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे’, मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते
बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा