शुक्रवारी (दि. 31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने शानदार विजय मिळवला. गुजरातने चेन्नईला 5 विकेट्सने पराभूत करत थाटात सुरुवात केली. गुजरातने आयपीएल इतिहासात चेन्नईला तिसऱ्यांदा सामना करताना पराभूत केले. या विजयात गोलंदाजांसोबतच फलंदाजांनीही मोलाचे योगदान दिले.
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 178 धावा केल्या होत्या. हे आव्हान गुजरातने 19.2 षटकात 5 विकेट्स गमावत 182 धावा करून पूर्ण केले. तसेच, 5 विकेट्सने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.
Match 1. Gujarat Titans Won by 5 Wicket(s) https://t.co/61QLtsnj3J #TATAIPL #GTvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
शुबमन गिलची यशस्वी झुंज
गुजरातकडून फलंदाजी करताना सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 36 चेंडूत 63 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त विजय शंकर (27), वृद्धिमान साहा (25) आणि साई सुदर्शन (22) यांनी मोलाचे योगदान दिले. कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला 8 धावांवर तंबूत परतावे लागले. मात्र, राशिद खानने संघाचा विजय आणखी सोपा केला. 9 चेंडूत 18 धावांची गरज असताना राशिदने19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजयाच्या जवळ नेले. त्यानंतर 6 षटकात 8 धावांची गरज असताना तुषार देशपांडेने पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतर राहुल तेवतियाने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजयी केले.
We WONNNNNN! 💙💙💙💙#GTVCSK | #AavaDe | #TATAIPL 2023
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 31, 2023
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना राजवर्धन हंगारगेकर (Rajvardhan Hangargekar) चमकला. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 36 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा या गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.
ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. मात्र, त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याच्याव्यतिरिक्त मोईन अली (23), शिवम दुबे (19), एमएस धोनी (14) आणि अंबाती रायुडू (12) यांनाच दोन आकडी धावसंख्या उभारता आली. याव्यतिरिक्त तीन फलंदाजांना 10 धावाही करता आल्या नाहीत.
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना तीन गोलंदाज चमकले. त्यात मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ यांचा समावेश आहे. या तिघांनीही प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याव्यतिरिक्त राशिद खान यानेही 1 विकेट घेत संघासाठी मोलाची कामगिरी केली. (gujarat Titans won by 5 wickets against csk ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेच ते दोन चेंडू, ज्यावर ऋतुराजने पंड्याला दाखवला पुणेरी दणका; खणखणीत षटकाराचा व्हिडिओ व्हायरल
विसाव्या ओव्हरचा बादशाह धोनीच! आयपीएल कारकीर्दीत त्यानेच ठोकलेत सर्वाधिक षटकार