पुणे। ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात शिबानी गुप्ते हिने तर, मुलांच्या गटात नमिश हूड यांनी विजेतेपद पटकावले. तर दुहेरीत मुलांच्या गटात आर्यन किर्तने व आरव पटेल या जोडीने विजेतेपद संपादन केले.
नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकित नमिश हूड याने अव्वल मानांकित स्मित उंद्रेचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. नमिश हा डीएव्ही पब्लिक शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहे. मुलींच्या गटात अंतिम फेरीत शिबानी गुप्ते हिने पाचव्या मानांकित रित्सा कोंडकरचा 6-2, 6-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. शिबानी ही विद्या व्हॅली शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून ओडीएमटी व फर्ग्युसन कॉलेज येथे प्रशिक्षक मारुती राऊत व संग्राम चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने याआधी मागील आठवड्यात याच ठिकाणी या गटाचे विजेतेपद पटकावले होते.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात आर्यन कीर्तने व आरव पटेल या अव्वल मानांकित जोडीने वेदांत गायकवाड व अथर्व डाकरे यांचा 6-2, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर आणि नटराज सोसायटीचे सदस्य वसंत साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन किर्तने, रिया किर्तने, एमएसएलटीए सुपरवायझर रिया चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी):
मुले: नमिश हूड वि.वि.स्मित उंद्रे[1] 6-4, 6-4;
मुली: शिबानी गुप्ते वि.वि.रित्सा कोंडकर[5] 6-2, 6-0;
दुहेरी: मुले: उपांत्य फेरी:
आर्यन कीर्तने/आरव पटेल[1]वि.वि.शौर्य गदाडे/हर्ष परिहार[4]6-4, 6-2;
वेदांत गायकवाड/अथर्व डाकरे वि.वि.कबीर गुंडेचा/वीर चतुर[3] 6-0, 6-2;
अंतिम फेरी: आर्यन कीर्तने/आरव पटेल[1]वि.वि.वेदांत गायकवाड/अथर्व डाकरे 6-2, 6-1.
महत्त्वाच्या बातम्या –
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: देशभरांतून १५० खेळाडू सहभागी