श्रीलंका आणि बांगलादेश या दोन क्रिकेट संघात बऱ्याच वर्षापासून कट्टर प्रतिस्पर्धा पाहायला मिळाली आहे. अशातच श्रीलंका संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील मालिकांमध्येही त्या घटनेचे पडसाद उमटलेले आहेत. त्यानंतर आता सोमवारी बांगलादेशने वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आणि वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे. त्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
ज्यामध्ये श्रीलंकेचा एक स्टार खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. कारण श्रीलंकेच्या या खेळाडूने यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, मात्र आता या खेळाडूने कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. तसेच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चाहते देखील हैराण झाले आहेत. कारण रंगाने 2023 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
याबरोबरच वानिंदू हसरंगाने 2020 मध्ये श्रीलंका संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्यानंतर हसरंगा संघासाठी फक्त 4 कसोटी सामने खेळला होता. तसेच हसरंगाने शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर तो आता पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
The Sri Lanka Cricket Selection Committee selected the below-given 17-member squad to take part in the Test series against Bangladesh. #BANvSL pic.twitter.com/KbNNW6xYOY
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 18, 2024
दरम्यान, यावेळी आयपीएल 2024 देखील सुरू होणार आहे, ज्यामुळे पहिल्या काही सामन्यांमध्ये वानिंदू हसरंगा सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग नसणार आहे. तसेच वानिंदू हसरंगा हा आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा एक भाग होता. त्यानंतर RCB ने IPL 2024 च्या आधी हसरंगा सोडले होते. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 च्या लिलावात हसरंगाला 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- अश्विन खरंच जान्हवी कपूरशी बोलत होता? आयपीएलआधी दिग्गजासोबत मोठा स्कॅम
- आयपीएलपूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, हा खेळाडू सुरवातीच्या सामन्यातून बाहेर?