---Advertisement---

‘खूप वेळा हार मानावी लागली, पण…’ जिंकल्यानंतर नेमकं काय म्हणाला बावुमा?

On: शनिवार, जून 14, 2025 7:29 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट ट्रॉफीचा अंतिम सामना 5 विकेट्सने गमावला आहे. आयसीसी ट्रॉफी जवळजवळ 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत आली आहे. टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 2025 चा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकून इतिहास रचला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकल्यानंतर सांगितले की, हा खूप खास दिवस होता. बावुमा म्हणाले की, आम्हाला येथे खूप पाठिंबा मिळाला आहे, ज्यामुळे आम्हाला दक्षिण आफ्रिकेत घरी परतल्यासारखे वाटते. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने सांगितले की, हा आमच्या संघासाठी एक खास क्षण आहे आणि आम्ही हा खास क्षण घरी घेऊन जात आहोत.

दक्षिण आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा पुढे म्हणाला की, ‘आम्ही सतत प्रयत्न करत आहोत, आम्हाला किती तरी वेळा निराशा हाती लागली आहे, किती तरी वेळा आमचे आणि आमचा चाहत्यांचे हृदय तुटले आहेत. पण आज आमचा कडे विजयाचा सूर्य आहे. आता आणखी ट्रॉफी जिंकण्याची आम्हाला आशा आहे. फायनल जिंकल्यानंतरही बावुमा आपल्या जागेवर बसून आपल्या संघासाठी जोरात टाळ्या वाजवत होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---