इंडियन प्रीमियर लीगचा थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ एप्रिल पासून ही स्पर्धा रंगणार आहे. अशातच सर्व संघांनी कसून सरावाला देखील सुरुवात केली आहे. आयपीएल २०२१ स्पर्धा भारतातच रंगणार आहे. अशातच आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय कसोटी संघातील संघातील क्रिकेटपटूने काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडच्या दिशेने मोर्चा वळवला आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी खेळाडूंचा फेब्रुवारीमध्ये लिलाव करण्यात आला होता. या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले, परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या हनुमा विहारीला कुठलाही खरीदीदार मिळाला नाही. त्यामुळे त्याने आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौऱ्याच्या सरावासाठी वारविकशायर संघाकडून काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळायची आहे. हनुमा विहारी या काऊंटी हंगामत कमीत कमी ३ सामने तरी खेळणार असल्याची माहिती मिळत आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “हो,विहारी या हंगामात इंग्लंडच्या काऊंटी स्पर्धेत वारविकशायर संघासाठी खेळणार आहे. तो काही सामने खेळणार आहे. तसेच तो इंग्लंडमध्येच आहे.”
वारविकशायर संघाने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. बीसीसीसायच्या अधिकाऱ्याने म्हटले की,” कराराच्या निगडित असलेल्या गोष्टींवर चर्चा सुरू आहे. तो कमीत कमी ३ सामने खेळणार आहे. आम्ही ही गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत की, त्याला आणखी सामने खेळता येतील का.”
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विहारिने महत्वाची भूमिका बजावली होती. सिडनीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात त्याच्या मांसपेशीमध्ये ताण आलेला असतानाही त्याने फलंदाजी केली होती. तसेच रविचंद्रन अश्विन सोबत मिळून सामना अनिर्णित राखण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने या डावात ४ तासांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी करत २३ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच चेन्नईला बसला फटका, ‘या’ बाबतीत झाले मोठे नुकसान
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा ५ परदेशी खेळाडू खेळवण्यात आले अन् घडले असे काही की…