भारतीय संघाचा (Team India) अनुभवी फलंदाज हनुमा विहारी (Hanuma Vihari) युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना तयार करण्यासाठी पुढे सरसावला आहे. भारतीय संघाच्या या खेळाडूने सेंट जॉन्स फाउंडेशनला २ लाख रुपये दान दिले आहेत. तसेच २० खेळाडूंचा खर्च उचलणार असल्याचीही माहिती दिली आहे. त्या कार्यासाठी विहारीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यावेळी कार्यक्रमात व्यक्त झाले.
रवी शास्त्री आणि भारतीय संघासाठी काम करतना त्यांचे सहकारी राहिलेल भरत अरुण (Bharat Arun) आणि आर श्रीधर (R Sridhar) यांनी गुरुवारी (३ मार्च) सेंट जॉन्स फाउंडेशचा शुभारंभ केला. यावेळी रवी शास्त्री म्हणाले की, हे फक्त नाव जोडण्यासाठी नाहीय, या जागेचा स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे. याठिकाणी ३० पेक्षा अधिक वर्षांमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी जन्म घेतला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हे एक वर्ल्ड क्लास सेंटर बनेल, जिथून चांगले खेळाडू बाहेर पडतील.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या मते सेंट जॉन्स फाउंडेशनचा उद्देश चांगले खेळाडू तयार करणे आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, प्रशिक्षकाव्यतिरिक्त कार्य, नैतिकता, शिस्त या सर्व गोष्टींवर जोर देऊन याला वाढवण्याचा प्रयत्न करतील. आम्ही हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करू की, येणाऱ्या खेळाडूंना चॅम्पियन बनण्याची गुणवत्ता विकसित करता येईल. आमचा प्रयत्न सुपर स्टार्सची निर्मिती करणे आहे.
याच कार्यक्रमात भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज हनुमा विहारीने या फाउंडेशनला २ लाख रुपयांची देणगी दिली आहे. याविषयी माहिती देताना विराहीने सांगितले की, तो चांगल्या गुणवंत खेळाडूंच्या शोधात आहे, तसेच २० युवा खेळाडूंना स्पॉन्सर देखील करणार आहे. यापूर्वी कोरोना माहामारी शिखरावर असतानाही विहारी सोशल मीडियावर खूप एक्टिव होता आणि कायम लोकांची मदत करण्याच्या प्रयत्नत दिसत असायचा.
महत्वाच्या बातम्या –
पुजारा-रहाणेला रिप्लेस करतील ‘हे’ खेळाडू? एकाला फक्त २ कसोटींचा अनुभव, पण आहे जबरदस्त लयीत
विराट कोहलीने केली रवी शास्त्रींची नक्कल, माजी प्रशिक्षकाने स्वत: शेअर केला मजेशीर व्हिडिओ
युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू