---Advertisement---

HBD ‘गब्बर’! चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

On: सोमवार, डिसेंबर 5, 2022 9:46 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवर फलंदाज शिखर धवन याने शनिवारी (5 डिसेंबर) वयाचे 37 वर्षे पूर्ण केले. सन 2010 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या फलंदाजाने अनेक मैदाने गाजवली. त्याने स्वतःच्या बळावर बऱ्याच सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या लेखात त्याच्या तीन उत्कृष्ट खेळीबद्दल माहिती पाहाणार आहोत.

पदार्पणाच्या कसोटीत केली 187 धावांची खेळी
धवनने सन 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे झालेल्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले. त्याने भारताच्या पहिल्याच डावात सलामीला येत 174 चेंडूत 187 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 33 चौकार ठोकले.

भारतीय संघ व्यवस्थापन गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा वारसदार म्हणून शिखर धवनकडे पाहत होते. त्याचदरम्यान धवनने चांगले प्रदर्शन करत सर्वांनाच प्रभावित केले. केवळ मर्यादित षटकांचा फलंदाज म्हणून धवनकडे पाहत असलेल्या लोकांना त्याने दाखववून दिले की, तो कसोटीतही प्रभावी ठरू शकतो.

वनडे विश्वचषक 2015 मध्ये केली 137 धावांची खेळी
धवनने क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाणाऱ्या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2015 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या साखळी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. या विजयात धवनने मोलाची कामगीरी बजावली होती. त्याने या सामन्यात 137 धावा केल्या होत्या. त्यावेळी ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी ठरली होती. रहाणेसमवेत धवनने तिसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली होती आणि भारताला 308 ही विशाल धावसंख्या उभारण्यास मदत केली होती.

श्रीलंकेविरुद्ध ठोकले वेगवान शतक
20 ऑगस्ट 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध डांबूला येथे झालेल्या वनडे सामन्यात धवनने 72 चेंडूत शतक ठोकले. हे त्याचे भारतीय संघाकडून वनडे सामन्यात ठोकलेले सर्वात वेगवान शतक ठरले. त्याने या सामन्यात 90 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे श्रीलंकेने दिलेले 217 धावांचे आव्हान भारतीय संघाने सहजपणे गाठले.

महत्वाची बाब म्हणजे त्याने त्याच्या खेळीत श्रीलंकेच्या संघाने ठोकलेल्या एकूण चौकारापेक्षा (18 चौकार) अधिक चौकार ठोकले. धवनने या खेळीत तब्बल 23 चौकार ठोकले.

महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार रोहित शर्माने मान्य केेली आपली चूक, ‘या’ मुळे भारताला स्वीकारावा लागला पराभव
इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज ठरतोय पाकिस्तानसाठी डोकेदुखी, खोऱ्याने ओढतोय धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---