भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीत दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. अद्याप या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. दरम्यान, या दौऱ्याबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटू विविध प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आता भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल एक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या दौऱ्यासाठी निवडकर्त्यांची डोकेदुखी अजूनच वाढणार आहे, कारण कोणते खेळाडू घ्यायचे कोणाला संघातून वगळावं हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ते हेदेखील म्हणाले की, भारताकडे यावेळी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मैदानात हरवण्याची सुवर्णसंधी आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी सामने आणि ३ वनडे सामने खेळणार आहेत. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर पासून सेंच्युरिअनमध्ये खेळवला जाईल. या दौऱ्यासाठी संघ लवकरच जाहीर होईल.
आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने देखील संघाबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘संघ निवडताना खूप गोंधळ होणार आहे. जर केएल राहुल (KL Rahul) फिट असेल तर तो नक्कीच संघात परत येणार. तसेच काही अहवालांनुसार सांगितलं जातंय की रोहित शर्मा कसोटीमध्ये उपकर्णधार बनू शकतो. रोहित शर्मा (Rohit Sharma) आल्याने संघ बळकट होईल.’
“मयंक अगरवाल (Mayank Agarwal) फॉर्ममध्ये आहे आणि शुबमन गिलने (Shubman Gill) देखील धावा केल्या आहेत. मधल्या फळीत श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आपली जागा संघात टिकवू शकतात की नाही हेदेखील बघण्यासारखं आहे.’
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवू शकतो- हरभजन सिंग (Harbhajan Singh)
हरभजन सिंग म्हणाले आपण यावेळी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरी हरवू शकतो. ते पुढे म्हणाले की, ‘माझ्या मते भारताला दक्षिण आफ्रिकेला हरवण्याची ही उत्तम संधी आहे, कारण त्यांचा संघ आधी सारखा भक्कम नाही. काही वर्षांपूर्वी फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis), एबी डी विलियर्स (AB De Villiers) ह्यांनी भारताला जिंकायची संधी नव्हती दिली.’
महत्त्वाच्या बातम्या –
ड्वेन ब्रावो म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले, हा देश माझ्या हृदयाच्या खूप जवळ”
“संपूर्ण आठवडा तुम्ही माझ्यासोबत असाल”, ऍशेस मालिकेपूर्वी स्टोक्स वडिलांच्या आठवणीत भावुक