भारतीय संघाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग (harbhajan singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवले. तसेच अनेकदा महत्वाच्या वेळी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करून भारतीय संघाचा विजय मिळवून दिला. परंतु हरभजन मागच्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर होता, मात्र त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नव्हती. अखेक शुक्रवारी (२४ डिसेंबर) त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची (harbhajan singh retirment) घोषणा केली. यानंतर आता हरभजनची पत्नी गीता बसरा (geeta basra) हिनेही एक भावूक पोस्ट केली आहे
हरभजनने ट्वीट करून ही निवृत्तीची घोषणा केली. ट्वीटमध्ये त्याने लिहिले होते की, ‘सगळ्या चांगल्या गोष्टी संपतात आणि आज मी त्या खेळातून निवृत्ती घेत आहे, ज्याने मला जीवनात खूप काही दिले आहे. मी त्या सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी २३ वर्षाच्या मोठ्या प्रवास सुंदर आणि आठवणीत राहण्यासारखा बनवला. तुमचे मनापासून आभार.’
यानंतर हरभजनची पत्नी गीताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती हरभजनसाठी म्हणते, ‘मला माहीत होते की, तुम्ही या क्षणाची वाट केव्हापासून पाहत होता. मानसिक स्वरूपात तर तुम्ही आधीच ठरवले होते, पण शारीरिक रूपात हा घोषणेची औपचारिकता बाकी होती. आज मला हे म्हणायचे आह की, मला तुमच्यावर अभिमान आहे. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत खूप काही मिळवले आहे.’
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘पुढे जात राहण्याचा हा प्रवास सुरूच राहील, जेथे खूप गोष्टी तुमची वाट पाहत आहेत. खेळताना मी तुमचा ताण आणि चिंतेसोबत मस्ती आणि उत्साह देखील पाहिला आहे. तुमच्या या उत्कृष्ट कारकिर्दीसाठी शुभेच्छा. २३ वर्ष खेळणे सोपे नसते. मी खूप भाग्यशाली आहे की, सगळ्या चढ-उतारादरम्यान तुमच्या सोबत राहिले. सेबत खूप आनंदी आहे की, आपली मुलगी हिनाया हिने वडिलांना स्टेडियममध्ये खेळताना पाहिले आहे.’
https://www.instagram.com/p/CX3Nh6xMOsg/?utm_source=ig_web_button_share_sheet
‘मला माहिती आहे हा अंत नाहीय. तुमची काहीतरी अपेक्षा आहे आणि तयारी केली आहे, पण नशीब आपल्या हातत नसते. तुम्ही नेहमीच उत्साह, फायर आणि धाडसासह खेळलात. आयुष्यातील येणाऱ्या दुसऱ्या पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा,’ असे गीताने पोस्टमध्ये लिहिले.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: ‘बंगाल वॉरियर्स’चा सलग दुसरा विजय, ‘गुजरात जायंट्स’ला ३१-२८ ने नमवले
जिंकायचं असल्यास शमी, बुमराहसह ‘या’ वेगवान गोलंदाजाला करा संघात सामील, नेहराचा कामाचा सल्ला
‘मास्टर ब्लास्टर’ सचिनलाही पडली रोहितच्या कसोटीतील फलंदाजीची भुरळ, कौतुकाने म्हणाला…
व्हिडिओ पाहा