---Advertisement---

वर्णद्वेषी टीका! ‘अशा मूर्खपणाची ही पहिलीच वेळ नाही, मलाही असंच..’, हरभजनकडून ‘त्या’ कटू आठवणींचा पुनरूच्चार

On: रविवार, जानेवारी 10, 2021 12:49 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (९ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याबद्दल वर्णद्वेषी टीका केल्याची तक्रार केली होती. असे असले तरी रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी देखील प्रेक्षकांमधून पुन्हा अशीच टीका सिराजवर करण्यात आल्याची तक्रार भारतीय संघाने केली आहे. त्यासाठी काहीवेळ सामनाही थांबला होता.

ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांचे गैरवर्तन पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच आपल्यासोबतच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कटू आठवणींचा पुनरूच्चार केला आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत हरभजनने लिहिले की, “ऑस्ट्रेलियात खेळत असताना मी स्वत: प्रेक्षकांच्या तोंडून माझ्याविषयी अनेक वाईट वक्तव्ये ऐकली होती. त्यांनी माझा रंग, माझा धर्म अशा अनेक विषयांवरुन माझ्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांनी व्यर्थ गोष्टी बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही.. तुम्ही त्यांना कसे थांबवाल??.”

भारतीय संघ सिराजच्या पाठीशी –

रविवारी दुसऱ्या सत्रात सिराज बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यादरम्यान प्रेक्षकांमधून काही जणांनी त्याच्यावर वर्णद्वेषी टीका केली. यानंतर सिराजने खूपवेळ वाट न पाहाता याबाबत कर्णधार अजिंक्य रहाणेला माहिती दिली. रहाणेनेही घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला.

मैदानावरील पंचं पॉल रायफल यांनी या प्रकरणाबाबत लगेचच सामनाधिकारी यांना माहिती दिली. त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना हे प्रकरण कळवले. त्यामुळे लगेचच सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेथून सिराजवर टीका करण्यात येत होती तिथे जाऊन चौकशी केली आणि चार-पाच लोकांना पोलिसांनी स्टँडबाहेर नेले. या दरम्यान जवळपास १० मिनिटे खेळ थांबला होता.

https://twitter.com/sarcastiqlonda/status/1348129750334590976?s=20

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांमध्ये वर्णद्वेषी टीका करण्याबाबत काहीवर्षांपूर्वीही आरोप झाले आहेत. पण त्यानंतर मधल्या वर्षात अशा प्रकारे मर्यादा सोडून कोणतीही घटना झाली नव्हती. मात्र आता पून्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला वादाचे गालबोट लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: आता सुट्टी नाय! चौथ्या दिवशीही तोच प्रकार, सिराजवर वर्णद्वेषी टीका; भारतीय संघाने थेट सामना थांबवला

कृणाल पंड्याने शिवीगाळ करत दिली करियर संपवण्याची धमकी, दीपक हुड्डाचा गंभीर आरोप

IND vs AUS: जडेजा तर बाहेर गेला, पंतचे काय? ‘ही’ आहे मोठी अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---