भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या विश्रांतीवर आहे. आगामी आयपीएल हंगामात तो गुजरात टायटन्स या नवीन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यावर्षी टी-२० विश्वचषकही खेळला जाणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) होणाऱ्या शिबिरात हार्दिकला उपस्थित राहण्यासाठी सुचना केली गेली आहे.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाच्या जर्सीमध्ये शेवटच्या वेळी नोव्हेंबर २०२१ मध्ये दिसला होता. त्यानंतर तो संघातून बाहेर आहे. माध्यमांतील वृत्तानुसार पुढच्या दोन दिवसांमध्ये तो एनसीएच्या शिबिरात सहभागी होईल अशी शक्यता आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर आयोजित केले गेले आहे.
आगामी टी-२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलिया भूषविणार आहे. भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या सेटअपमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व खेळाडूंना रिपोर्ट करण्यास सांगितले गेले आहे. त्याशिवाय मर्यादित षटकांमध्ये जे भारतीय संघाचा भाग आहेत, त्यांना याठिकाणी बोलवले गेले आहे. आयपीएल २०२२ पूर्वी या खेळाडूंचे एक शिबिर आयोजित केले जाणार आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तो भारतासाठी अनेक सामने जिंकवणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ११ कसोटी, ६३ एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटी संघासोबत त्याने ५३२ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये अनुक्रमे १२८६ आणि ५५३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने कसोटी संघासाठी १७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एकदिवसीय संघासाठी ५७ आणि टी-२० संघासाठी ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये हार्दिक मागच्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी खेळत होता. त्याने आयपीएलमध्ये २७.३३ च्या सरासरीने आणि १५३ च्या स्ट्राइक रेटने १४७६ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत ४२ विकेट्स घेतल्या आहेत. पण आगामी हंगामापूर्वी मुंबईने त्याला रिलीज केले.
मेगा लिलावापूर्वी नवीन आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सने त्याला १५ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. मागच्या वर्षी फिटनेस खराब असतानाही त्याला टी-२० विश्वचषकासाठी संधी दिली गेली होती, पण त्याने पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली. त्यानंतर त्याने स्वतः पुढचे काही दिवस तो खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. आगामी आयपीएल हंगामात तो कसो प्रदर्शन करतो, यावर सर्वाचेच लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी महिलांचा विश्वचषकात सलग दुसरा पराभव, ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने मिळवला सोपा विजय
फलंदाजीत तर तुलना होतेच, पण आता पाकिस्तानच्या आझमची गोलंदाजीतही विराटची कॉपी, पाहा व्हिडिओ
‘चाहर फॅमिली’त लवकरच वाजणार सनई चौघडे, ‘या’ तारखेला राहुल प्रेयसीसंगे बांधणार लग्नगाठ