आयसीसीच्या साप्तहिक क्रमवारीत बुधवारी (8 फेब्रुवारी) भारतीय फलंदाज शुबमन गिल आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना फायदा झाला. मागच्या आठवड्यात जास्त सामने खेळले गेले नाहीत, पण तरीही क्रमवारीत काही महत्वाचे बदल मात्र पाहायला मिळाले. सुधारित क्रमवारीत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना विचारत घेऊन तयार केली गेली आहे.
आयसीसी टी-20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याने थेट 168 स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठले. सध्या तो टी-20 फलंदाजांच्या यादीत 30 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलने न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 126 धावा केल्या आहेत. भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये केली केलेली ही सर्वाच्च वैयक्तिक खेळी ठरली.
टी-20 फलंदाजांच्या यादीत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) तीन स्थानांच्या फायद्यासह 50 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल चार स्थानांच्या पायद्यासह 25 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादव या फॉरमॅटमध्ये सुधारित क्रमवारीत देखील पहिल्या क्रमांकावर कायम आहे. टी-20 गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंग () त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. तो आठ स्थानांच्या फायद्यासह 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अर्शदीपने त्याच्या शेवटच्या सामन्यात 16 धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या 20 स्थानांच्या पायद्यासह 46 व्या क्रमांकावर पोहोचला. अष्टपैलूंच्या यादीत देखील हार्दिकचा फायदा झाला आहे. हार्दिक 250 रेटिंग पॉइंट्ससह सध्या जगातील दुसरा सर्वोत्तम टी-20 अष्टपैलू बनला आहे. पहिल्या क्रमांकावरील शाकिब अल हसनपेक्षा फक्त 2 पॉइंट्स त्याच्याकडे कमी आहेत.
On the 🆙
Indian stars soar in the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings after the series victory against New Zealand 💪https://t.co/BnYA0gbrWB
— ICC (@ICC) February 8, 2023
वनडे क्रमवारीत जे महत्वाचे बदल पाहायला मिळाले, त्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सहा स्थानांच्या फायद्यासह 20 व्या क्रमांकाव पोहोचला. डेविड मलान 31 स्थानांच्या फायद्यासह 58 व्या क्रमांकावर पोहोचला, तर हेनरिक क्लासेन 11 स्थानांची झेप घेत 42 व्या क्रमांकावर पोहोचला. वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा जोफ्रा आर्चर 13 स्थानांच्या फायद्यासह 22 व्या क्रमांकावर पोहोचला, तर दक्षिण आफ्रिका संघाचा लुंगी एनगिडी पाच स्थानांच्या फायद्यासह 19 व्या क्रमांकावर पोहोचला. (Hardik Pandya and Shubman Gill benefit in latest ICC rankings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आमची खेळपट्टी जीवघेणी नाही…’, टीका करणाऱ्या ऑसी खेळाडूंना गावसकरांचे चोख उत्तर
कर्णधार आणि प्रशिक्षकांचा निर्णय झाला! निवडकर्त्यांनी संघात घेतलेल्या 6 जणांना बसवणार संघाबाहेर