---Advertisement---

हार्दिक पंड्याने चक्क आजीबाईंसोबत धरला ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘या’ गाण्यावर ठेका, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

On: बुधवार, जानेवारी 26, 2022 5:09 PM
Hardik Pandya
---Advertisement---

भारतीय संघाचा (team India) दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या राष्ट्रीय संघातून बाहे असला, तरी सोशल मीडियावर तो सतत सक्रिय असतो. संपूर्ण भारतात सध्या दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा’ या चित्रपटाची चर्चा आहे. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाच्या डायलॉगवर आणि ‘तेरी झलक शर्फी श्रीवल्ली’ या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता या यादीत हार्दिक पंड्या देखील जोडला गेला आहे.  हार्दिकने त्याच्या आजीसोबत हा व्हिडओ बनवला आहे.

हार्दिक पंड्याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ही रिल शेअर केली आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आजीसोबत श्रीवल्ली गाण्यावर डान्स करत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडल्याचे दिसत आहे. इंस्टाग्रामवर ही रिल शेअर केल्यानंतर जवळपास दोन तासांमध्ये त्याला १ मिलियन चाहत्यांच्या लाईक मिळाल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CZL7EjEl2cL/

दरम्यान, अल्लू अर्जुनचा हा ‘पुष्पा; चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. हिंदी भाषिक चाहत्यांसाठी हा चित्रपट हिंदीमध्येही डब केला गेला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने या चित्रपटातील एका डायलॉगवर सर्वप्रथम इंस्टाग्राम रिल तयार केली होती. जडेजा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीवर काम करत होता आणि यावेळी त्याची दाडी मिशी आणि केस पुष्पा चित्रपटातील मुख्य पात्रासारखे वाढलेले होते. याच लूकमध्ये जडेजाने हा व्हिडिओ तयार केला होता आणि चाहत्यांकडून त्याला खूप पसंती मिळाली होती.

जेडजाच्या व्हिडिओनंतर क्रिकेट विश्वातील अनेकांनी या डायलॉगवर रिल तयार केले आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले. यामध्ये भारतीय संघातील सूर्यकुमार यादव, सुरेश रैना, ईशान किशन, शिखर धवन या खेळाडूंचा समावेश होता. विदेशातील खेळाडूंचा विचार केला, तर डेविड वॉर्ननचे नाव पहिल्यांदा घेतले पाहिजे. ऑस्ट्रेलियन दिग्गज सलामीवीर वॉर्नने या चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यावर दोन वेगवेगळ्या रिल तयार केल्या आहेत. तसेच वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोनेही यावर व्हिडिओ तयार केला होता.

महत्वाच्या बातम्या –

Video: ‘पुष्पा’ फिवर! मानेपर्यंत रुळणारे केस मोकळे सोडत राहूल चाहरचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर भन्नाट डान्स

आयपीएल लिलावात ‘या’ दोन परदेशी खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर; एक आहे बीबीएलचा सर्वोत्तम खेळाडू

आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांवर लागू शकते कोटींची बोली, १० संघांमध्ये रंगणार रंजक लढत

व्हिडिओ पाहा –

पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते । story of Cheteshwar Pujara

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---