मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच घटस्फोट घेणार आहेत. नताशानं हार्दिकच्या संपत्तीचा 70 टक्के वाटाही मागितला असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र या प्रकरणात एक ट्विस्ट आहे.
हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिकच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हार्दिक बोलताना दिसतो की, त्यानं त्याचं घर आणि कार आईच्या नावावर घेतली होती. असं झालं तर नताशाला हार्दिकच्या संपत्तीतलं काहीच मिळणार नाही.
व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या म्हणतो की, “माझ्या वडिलांच्या खात्यात आईचं नाव आहे. माझ्या भावाच्या खात्यातही आईचं नाव आहे. सर्व काही तिच्या नावावर आहे. माझी कार, माझं घर आणि इतर सर्व काही. मी ते माझ्या नावावर घेणार नाही. पुढे जाऊन मला माझा 50 टक्के वाटा कोणालाच द्यायचा नाही. मला काहीही झालं तरी माझे 50 टक्के जाणार नाही.”
Bhai ne sab pehle hi plan kar rakha hai 😂 pic.twitter.com/FcrOH2rHiJ
— v. Jatin (@JatinTweets_) May 25, 2024
घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये अनेकदा मालमत्तेचा प्रश्न अडकतो. पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला तर या प्रकरणातही संपत्तीचा मुद्दा कळीचा ठरू शकते. जर हार्दिकनं खरोखरच आपली संपत्ती आईच्या नावावर घेतली असेल तर नताशाला त्याच्या संपत्तीतलं काहीच मिळणार नाही. अशाप्रकारे आईच्या नावावर मालमत्ता असणं, हे हार्दिकसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतं.
हार्दिक पांड्या कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. मुंबईची टीम त्याला एका हंगामासाठी 15 कोटी रुपये पगार देते. हार्दिक भारतीय संघाचा करारबद्ध खेळाडू आहे. याद्वारे देखील तो कमाई करतो. तसेच जाहिरातींच्या माध्यमातूनही त्याची करोडोंची कमाई होते.
महत्त्वाच्या बातम्या –
नताशा स्टॅनकोविच पूर्वी हार्दिक पांड्यानं ‘या’ सेलिब्रिटींना डेट केलं होतं, जाणून घ्या
हार्दिक पांड्याच्या संपत्तीचा 70 टक्के हिस्सा घेणार नताशा? मुंबईच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती?