भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा नवा उपकर्णधार केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. कोविड-१९ मुळे यंदा युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात राहुल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आगामी मालिकांसाठी भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राहुलसह इतर खेळाडूही सिडनी येथील जिममध्ये घाम गाळताना दिसले.
राहुलने केला जिम मधील व्हिडिओ शेअर
दौर्याची सुरुवात होण्यास एका आठवड्याचा अवधी शिल्लक आहे. भारताचा नवा उपकर्णधार असलेल्या केएल राहुलने एक व्हिडिओ शेअर करून भारतीय संघाच्या तयारीची माहिती दिली आहे.
राहुलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडू प्रशिक्षकांच्या निरक्षणाखाली कठोर परिश्रम करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये राहुलचा जवळचा मित्र असलेला हार्दिक पंड्यासुद्धा आपले ‘मसल्स’ दाखवताना दिसत आहे. राहुलने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की, “असे ग्रुप ट्रेनिंग आम्हाला खूप आवडते. खुप दिवसानंतर आम्ही एकत्र आलो आहोत.”
Loving the group training sessions 🇮🇳
Had been too long since we all did that 💪🏻 pic.twitter.com/ILsQwzm353— K L Rahul (@klrahul) November 20, 2020
आयपीएलमध्ये राहुलने पटकावली होती ऑरेंज कॅप
राहुलसाठी आयपीएल २०२० चा हंगाम अत्यंत लाभदायक ठरला. तो प्रथमच आयपीएलमध्ये नेतृत्व करत होता. किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करताना त्याने आपल्या नेतृत्त्वगुणांची झलक दाखवली. एक खेळाडू म्हणून देखील तो कमालीचा यशस्वी ठरला. स्पर्धेत १४ सामने खेळताना त्याने ६६८ धावा ठोकल्या. ज्यात एका शतकाचा समावेश होता. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूला दिली जाणारी ‘ऑरेंज कॅप’ राहुलने आपल्या नावे केली होती.
२७ तारखेपासून होत आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. दौऱ्यावर सर्वप्रथम वनडे मालिका खेळवली जाईल. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने सिडनी येथे खेळले जातील. त्यानंतर तिसरा वनडे आणि पहिला टी२० सामना कॅनबरा येथे खेळवला जाईल. अखेरच्या दोन टी२० सामन्यांसाठी दोन्ही संघ पुन्हा सिडनी येथे दाखल होतील. अखेरीस, १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
लईच भारी! महिला बीबीएलमध्ये हिलीने झळकावले शतक; पती स्टार्कने अशाप्रकारे आनंद केला साजरा
ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे रोहितविषयी वादग्रस्त वक्तव्य; ‘हिटमॅन’चे चाहते नाराज
…म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाज झाले यशस्वी, मोहम्मद शमीचा खुलासा