मंगळवारी (दि. 08 ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाच्या हाती यश आले. भारताने या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या विजयानंतर भारताने मालिकेत 1-2 ने पुनरागमन केले. या विजयामुळे कर्णधार हार्दिक पंड्या खूपच खुश झाला. यावेळी हार्दिक पंड्याने निकोलस पूरनला आव्हान दिले.
टी20 मालिकेत निकोलस पूरन (Nicholas Pooran) बॅटमधून धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे 41 आणि 67 धावांची झंझावाती खेळी साकारत संघाला विजयी केले होते. दुसऱ्या टी20त तो एकटाच भारतीय संघावर वर्चस्व गाजवताना दिसला. मात्र, तिसऱ्या टी20त हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने पूरनला कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्यामार्फत बाद केले होते. पूरनने येताच मोठा फटका मारले. त्याने 1 षटकार आणि 2 चौकार मारले. मात्र, कुलदीपसमोर त्याने गुडघे टेकले. कुलदीपने त्याला संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या हातून झेलबाद केले. मात्र, कर्णधार रोवमन पॉवेल (Rovman Powell) याने आपली संपूर्ण ताकद लावून संघाची धावसंख्या 159पर्यंत पोहोचवली. यावेळी त्याने 19 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या होत्या.
पूरनविषयी काय म्हणाला पंड्या?
मात्र, पंड्याने चौथ्या टी20 सामन्यासाठी विंडीजच्या कर्णधाराला नाही, तर फॉर्ममध्ये असलेल्या पूरनला आव्हान दिले आहे. तो पूरनविषयी बोलताना म्हणाला की, “जर निकी मारू इच्छितो, तर त्याला माझ्या गोलंदाजीवर मारू द्या. मी अशा प्रतिस्पर्धेचा आनंद घेत आहे. मला माहिती आहे की, तो हे ऐकेल. मला आशा आहे की, चौथ्या टी20त तो माझ्याविरुद्ध मोठे फटके मारेल आणि शेवटी मला विकेट देईल.”
Hardik Pandya said – "If Nicholas Pooran wants to hit let him hit me, that was the plan and I enjoy such competitions. I know he is going to hear this and will come hard at me". pic.twitter.com/oaIh9j8W39
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 8, 2023
पंड्याच्या या वक्तव्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, पंड्याने पूरनच्या फलंदाजीवर ब्रेक लावण्यासाठी चांगला सराव केला आहे. आता 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात ही लढाई कोण जिंकतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
खरं तर, निकोलस पूरन याची सर्वात मोठी कमजोरी कुलदीप यादवकडे आहे. टी20त दोघे आतापर्यंत 5 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये कुलदीपने 3 वेळा त्याला बाद केले आहे. कुलदीप दुसऱ्या टी20चा भाग नव्हता, त्यामुळे पूरनने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. (hardik pandya gave open challenge to nicholas pooran for ind vs wi 4th t20 read here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्वार्थी कर्णधार…’, हार्दिक पंड्या तिलकपुढे बनला Selfish, संतापलेल्या चाहत्यांना आठवला धोनी
अहमदाबादबाहेर गिलची दांडी गुल! टी20 करियरची आकडेवारी अत्यंत लाजिरवाणी, नक्की पाहा