मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात गुरुवारी (१४ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने ३७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गुजरातच्या विजयात कर्णधार हार्दिक पंड्याने मोलाचा वाटा उचलला. त्याने प्रत्येक विभागात आपले योगदान देत अष्टपैलू कामगिरी केली. पण, या सामन्यादरम्यान तो दुखापतीमुळे अचानक मैदान सोडतानाही दिसला. याबद्दल सामन्यानंतर हार्दिक पंड्यानेच प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिकने वाढवले होते गुजरातचे टेंशन
झाले असे की, प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून हार्दिकने (Hardik Pandya) ५२ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले. पण, जेव्हा तो गोलंदाजीला आला तेव्हा त्याचे तिसरे षटक टाकत असताना तो दुखापतग्रस्त होऊन मैदानातून बाहेर गेला. त्यापूर्वी त्याने गोलंदाजी करताना जेम्स निशमची विकेटही घेतली होती. मात्र, अचानक हार्दिक मैदानातून बाहेर गेल्याने गुजरातच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. पण ही गंभीर दुखापत नसल्याने सामन्यानंतर हार्दिकनेच स्पष्ट केले.
गंभीर नाही दुखापत – हार्दिक पंड्या
सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, ‘हा विजय खूप खास होता. मला केवळ क्रॅम्प आला होता, ही दुखापत फार गंभीर नाही. मी मागच्या सामन्यात १५ षटके आणि या सामन्यात १७ षटके फलंदाजी केली. कदाचीत त्याचमुळे हा क्रॅम्प आला असावा. मला इतकावेळ फलंदाजी करण्याची सवय नाही.’
तो पुढे म्हणाला, ‘कर्णधार म्हणून मला चौथ्या क्रमांकावर फलंजाजी करायची इच्छा होती, जेणेकरुन अन्य फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळेल. कर्णधारपद सांभाळताना मजा येते, कारण तुम्ही पुढे येऊन नेतृत्व करता. सर्वमिळून एकमेकांच्या यशाचा आनंद घेत आहेत. आम्ही असे वातावरण बनवले आहे आणि आमच्यासाठी हे काम करत आहे. मी वाटते की सर्वजण खूश राहू.’
हार्दिकची अष्टपैलू कामगिरी
राजस्थानविरुद्ध हार्दिकने फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देण्याबरोबरच क्षेत्ररक्षणातही मोलाचा वाटा उचलला. त्याने संजू सॅमसनला धावबाद केले. हार्दिक गेल्या काही सामन्यांपासून चांगली कामगिरी करत आहे. त्याने मागच्या सामन्यात देखील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५० धावांची खेळी केली होती.
गुजरातने जिंकला सामना
या सामन्यात (RR vs GT) गुजरातने २० षटकात ४ बाद १९२ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार हार्दिकशिवाय अभिनव मनोहरने ४३ धावा करत महत्त्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून युजवेंद्र चहल, कुलदीप सेन आणि रियान पराग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. त्यानंतर १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाला २० षटकांत ९ बाद १५५ धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानकडून जोस बटलरने ५४ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला फार काही खास करता आले नाही. गुजरातकडून यश दयाल आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त हार्दिक नव्हे हार्दिक २.० व्हर्जन म्हणा! गुजरात टायटन्सचा कर्णधार प्रत्येक विभागात दाखवतोय चमक
आर अश्विन का आला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला? संजू सॅमसनने केला खुलासा
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल हैदराबाद वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही