टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने अलीकडेच त्याची पत्नी नताशासोबतचे 4 वर्षे जुने नाते संपुष्टात आणले. या निर्णयानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवांना पुष्टी मिळाली. एकमेकांपासून लांब झाल्यानंतर नताशा आणि हार्दिक दोघेही इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह दिसले. एकीकडे हार्दिक श्रीलंका दौऱ्यावर आहे, तर दुसरीकडे नताशा मुलगा अगस्त्यासोबत सर्बियामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. नताशाने तिच्या मुलासोबतचे काही फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये हार्दिक पांड्याने तीन कमेंट्स केल्या आणि ती पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
हार्दिक पांड्यासाठी 18 जुलै 2024 ही तारीख दुःस्वप्न ठरली. हीच तारीख होती जेव्हा हार्दिक पांड्याला दोन वाईट बातम्या मिळाल्या. एकीकडे त्याने टी20 संघाचे कर्णधारपद गमावले आणि दुसरीकडे त्याला व्यक्तिक जीवनात कठीण निर्णय घ्यावा लागला. त्याने 18 जुलै रोजी पुष्टी केली होती की त्याने आता नताशासोबतचे नाते संपुष्टात आणले आहे. पण हार्दिकला मुलगा अगस्त्याच्या आठवणींनी पछाडले आहे. नताशाच्या पोस्टवर त्याने 3 वेळा कमेंट केली. हार्दिकने दोनदा हार्ट इमोजी बनवले तर पहिल्या वेळी काही इमोजी बनवून कमेंटही केली.
श्रीलंका दाैऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्या पहिल्या हेड कोच म्हणून नियुक्त झालेल्या गाैतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टी20 मालिका खेळण्यास तयार आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून हार्दिकने आपले नाव मागे घेतले आहे. व्यक्तिक कारणांमुळे तो वनडे मालिकेसाठी उपल्बध असणार नाही. याची स्पष्टता त्याने आधीच दिली होती.
हेही वाचा-
नीता अंबानी यांची ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या सदस्यपदी एकमताने फेरनिवड
जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणारा ‘किंग’ कोहली रचणार इतिहास?
“सीएसकेकडून खेळणे देवाने दिलेली भेट आहे” संघात निवड झाल्यानंतर श्रीलंकन खेळाडू भावूक