दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लूजनर याने भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, हार्दिक याची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते. शनिवारी (दि. 03 जून) क्लूजनरने मोठे विधान करत म्हटले की, वर्कलोड सांभाळण्यासाठी तो कसोटी क्रिकेट सोडू शकतो. कारकीर्दीत अनेकदा दुखापतींचा सामना करत आलेल्या पंड्याने अखेरचा कसोटी सामना सप्टेंबर 2018मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आला आहे. तसेच, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापासूनही स्वत:ला दूर ठेवले आहे.
लान्स क्लूजनर (Lance Klusener) याने एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “पंड्या शानदार क्रिकेटपटू आहे. तो जर फिट राहिला आणि ताशी 135 किमी गतीने चेंडू फेकला, तर त्याचा सामना करणे नेहमी कठीण आहे. तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.”
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने भारताच्या या प्रवासात एकही टक्के योगदान न दिल्यामुळे आणि इतरांची जागा घेणे योग्य नाही, असे म्हणत स्वत:ला डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यातून बाहेर केले. क्लूजनर यांना असे विचारण्यात आले की, पंड्याने सहजरीत्या कसोटी क्रिकेट सोडले आहे का? याचे उत्तर देताना ते म्हणाले की, “कदाचित, कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात मोठी कसोटी ही कसोटी क्रिकेटची असते. कसोटी क्रिकेटमध्ये इतका बदल झाले नाहीत, पण मी समजू शकतो की, वेळ बदलला आहे.”
क्लूजनर असेही म्हणाले की, भारत डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात वेगवान गोलंदाजी किंवा फिरकीच्या आधारावर आक्रमण उतरवू शकतो. ते म्हणाले, “फिरकी पारंपारिकरीत्या भारताची ताकद राहिली आहे. त्यांच्याकडे असे आक्रमण आहे, जे कोणत्याही खेळपट्टीवर चांगले खेळू शकते. वेगवान गोलंदाजांनीही मागील काळात शानदार प्रदर्शन केले आहे आणि त्यामुळेच ते सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. आता हिरव्या खेळपट्टीवर ते चांगला खेळ दाखवतात.”
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील प्रबळ दावेदाराविषयी विचारले असता ते म्हणाले की, “हे सांगणे कठीण आहे. हा ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांचा सामना असेल. यामध्ये जो जिंकेल, तोच विजेता ठरेल.”
डब्ल्यूटीसी अंतिम सामना (WTC Final Match) 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी खूपच उत्सुक आहेत. (hardik pandya is one of the best pace bowling allrounders in world cricket said this cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: MPLमध्ये 6 संघांवर रेकॉर्डब्रेक बोली! ऋतुराज पुण्याकडे, तर केदार कोल्हापूरकर; लगेच वाचा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट करणार भीमपराक्रम, विवियन रिचर्ड्स-सेहवागचा ‘हा’ विक्रम होणार उद्ध्वस्त!