---Advertisement---

हार्दिकचे फिरले ग्रह! संघातील स्थान गमावलेच आता सोसावे लागणार आर्थिक नुकसानही

On: सोमवार, डिसेंबर 20, 2021 10:57 PM
hardik-pandya
---Advertisement---

भारतीय संघाचा (indian cricket team) दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik pandya) मागच्या बऱ्याच दिवासंपासून खराब फॉर्ममध्ये आहे. सध्या याच कारणास्तव त्याला संघातून बाहेर केले गेले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी एका सामन्यादरम्यान हार्दिकच्या कंबरेला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचा खराब फॉर्म कायम आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळायची आहे. अशी माहिती समोर येत आहे की, हार्दिक या मालिकेतही खेळू शकणार नाही. तसेच आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला मोठे नुकसान होईल अशी, शक्यता वर्तवली जात आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशातील मालिकेला मुकणार

कंबरेच्या दुखापतीमुळे हार्दिकने मागच्या बऱ्याच काळापासून गोलंदाजी केलेली नाही. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक जानेवारी महिन्यापासून गोलंदाजी फिटनेसवर काम करण्यासाठी बेंगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (nca) दाखल होणार आहे. जोपर्यंत तो गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त होत नाही, तोपर्यंत त्याचे संघातील पुनरागमन अशक्य मानले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात मालिका खेळली जाणार आहे. त्यामध्ये देखील हार्दिकचे पुनरागमन अशक्य आहे.

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात होणार मोठे नुकसान

आयपीएल २०२२ हंगाम सुरु होण्यापूर्वी बीसीसीआय मेगा लिलाव आयोजित करणार आहे. अशात हार्दिकला आयपीएलच्या या मेगा लिलावात देखील मोठे नुकसाना होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याला रिलीज केले आहे. माध्यमांमध्ये अशाही बातम्या समोर आल्या आहेत की, पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये नव्याने सामील होणाऱ्या अहमदाबाद आणि लखनऊ या दोन्ही फ्रेंचायझींनी हार्दिकशी संपर्क साधला आहे. मात्र, या फ्रेंचायझी त्याला मोठी रक्कम देण्यासाठी तयार नाहीत.

हार्दिकच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने २०१५ साली मुंबई इंडियन्स संघाकडून त्याचे पदार्पण केले होते. पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सने त्याला संघात सामील करण्यासाठी १० लाख रुपये मोजले होते. परंतु त्याच्या दमदार प्रदर्शनाने पुढच्या तीन वर्षात त्याने १० लाखावरून ११ करोड रुपयांपर्यंतचा टप्पा पार केला. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी १५० च्या सरासरीने १४७६ धावा केल्या. असे असले तरी, तो सध्या खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे आगामी हंगामात त्याला मोठे नुकसाने होऊ शकते. या खराब फॉर्ममधून तो कशाप्रकारे बाहेर येतो हे पाहवे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी नव्हते पैसे; तरीही प्रनॉयने उंचावली देशाची मान

राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: पंजाब-उत्तर प्रदेश संघात रंगणार अंतिम लढत

वॉर्नर, रूटचे झालेही नव्हते टेस्ट पदार्पण, इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियातील शेवटच्या कसोटी विजयानंतर झालेत कमालीचे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---