भारतीय संघाने सिडनी क्रिकेट मैदानावरील दुसर्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारली. ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले १९५ धावांचे आव्हान भारताने ६ गडी राखून पूर्ण केले. या सामन्यात २२ चेंडूत ४२ धावा काढणारा हार्दिक पंड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात भारतीय संघाला १४ धावांची गरज होती. सामना कुठल्याही संघाकडे झुकण्याची शक्यता असताना हार्दिक पंड्याने २० व्या षटकात दोन गगनचुंबी षटकार मारत भारताला सामना जिंकवून दिला.
हार्दिक ठरला ‘नवा फिनिशर’
भारतीय संघासाठी यापूर्वी ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी कायमच फिनिशरची भूमिका निभावत असे. षटकार मारून सामना संपविणे, ही धोनीची खासियत होती. हीच परंपरा आजच्या सामन्यात हार्दिक पंड्याने पुढे चालविली. २० व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स गोलंदाजीसाठी आला असताना भारताला १४ धावांची गरज होती. हार्दिक पंड्याने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेत सावध सुरुवात केली. त्यानंतर दुसर्या चेंडूवर लॉंग ऑनच्या दिशेने त्याने जोरदार षटकार खेचला. तिसरा चेंडू निर्धाव पडला. मात्र, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने षटकार मारत हार्दिकने भारताचा विजय निश्चित केला.
We have found our finisher now!!
The hard hitting Pandya !
What an amazing inning he played to see us through
An absolute carnage at Sydney.
Take a bow Hardik Pandya 🙇 #indvsausT20 #INDvAUS #HardikPandyapic.twitter.com/qzdbgrLQ2F— Gaurav (𝕄𝕀) (@MI_2019_20) December 6, 2020
Winning SIX #hardikPandya #indvsausT20 #AUSvsIND https://t.co/JzYM2FN6W1
— VSD 07 💛💛 🇮🇳 (@VSD_123) December 6, 2020
https://twitter.com/Prathap9061/status/1335556117196206089
भारताने जिंकली टी-२० मालिका
वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागल्याने टी-२० मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर होते. कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेला पहिला टी-२० सामना जिंकत भारताने मालिकेची सकारात्मक सुरुवात केली होती. तीच विजयी वाटचाल कायम राखत भारताने दुसर्या सामन्यातही विजय मिळवत मालिकेवर कब्जा केला. या टी-२० मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर ८ डिसेंबर रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैव म्हणतात ते हे! विराटकडून झेल सुटूनही ऑस्ट्रेलियन कर्णधार झाला रनआऊट, पाहा Video
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर