भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळले जाणार आहेत. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ जिंकला होता, तर एक सामना यजमान वेस्ट इंडीजने नावावर केला होता. दोन्ही संघ चौथ्या टी-२० सामन्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. अशात भारतीय संघाचा महत्वाचा अष्टपैलू हार्दिक पंड्यासह इतर खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वेस्ट इंडीज आणि भारत (IND vs WI) यांच्यातील शेवटचे दोन्ही टी-२० सामने अमेरिकेच्या प्लोरिडा शहरात खेळले जाणार आहेत. चौथा आणि पाचवा टी-२० सामन अनुक्रमे ६ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि संघातील काही इतर खेळाडू मियमीच्या समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसले आहेत. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खेळाडूंना स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याठिकाणचे फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, भारतीय संघासाठी सूर्यकुमारने तिसऱ्या टी-२० सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने या सामन्यात ४४ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या आणि संघाचा विजय सोपा केला. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. भारत सध्या मालिकेत १-२ आशा घाडीवर आहे. चौथ्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर संघ टी-२० मालिकाही नावावर करेल. तत्पूर्वी उभय संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप (०-३) दिला होता.
शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी दोन्ही संघ –
वेस्ट इंडीज संघ –
निकोलस पूरन (कर्णधार), रॉवमन पॉवेल (उपकर्णधार), शमरह ब्रूक्स, डोमिनिक ड्रेक्स, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रैंडन किंग, काइल मेयर्स, ओबेद मैककॉय, कीमो पॉल, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, डेवोन थॉमस, हेडन वॉल्श जूनियर.
भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, इशान किशन, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘आशिया कप आणि टी२० विश्वचषकांत कोण असेल कर्णधार रोहितचा जोडीदार?’, माजी दिग्गजाने स्पष्टचं सांगितलं
‘पाकिस्तान संघात खेळण्यासाठी लागते वशिलेबाजी?’ माजी दिग्गजाने ‘या’ खेळाडूच्या निवडीवरून साधला निशाणा
‘त्याच्यामुळे इतर खेळाडूंची प्रतिभा डावलली जाते?’, श्रेयस अय्यरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह