इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. कोलकाताच्या इडन गार्डनवर रंगलेल्या या सामन्यात गुजरातने राजस्थानला ७ विकेट्सने पराभूत केले. पण या सामन्यात गुजरातला ऑरेंज कॅप जोस बटलरचा झेल सोडणे भारी पडू शकले असते.
गुजरातने नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानने १८८ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये बटलरने ५६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ८९ धावा केल्या. यादरम्यान तो दोन वेळा बाद होता-होता वाचला होता. त्याला पहिले जीवनदान गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि दुसरे जीवनदान राशिद खानकडून मिळाले. नंतर त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
या सामन्यामध्ये यश दयाल गोलंदाजी करत असताना १७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बटलरने लॉग्न ऑनला शॉट मारला होता. तेव्हा सीमारेषेवर उभा असलेला हार्दिक झेल घेण्याच्या प्रयत्नात घसरला आणि चेंडू सीमारेषेपार जाऊन राजस्थान संघाला चार धावा मिळाल्या. हा झेल सोडण्याआधी बटलर ३९ धावांवर होता. या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/RiddhiTweets_/status/1529127112338468864
बटरलला बाद करण्यात गुजरात पुन्हा एकदा अपयशी ठरला होता. मोहमद शमीने १९वे षटक टाकले असता त्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर राशिद खानने मिड विकेटवर बटलरचा झेल सोडला. मात्र तो २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. हा चेंडू नोबॉल होता, पण त्याने उत्तम फलंदाजी करत गुजरातसमोर चांगले लक्ष्य ठेवले.
क्वालिफायर सामन्यात बटलरने ३८ चेंडूत ३९ धावा करत फलंदाजीला संथ सुरूवात केली होती. पण अर्धशतक आणि जीवनदान मिळाल्यावर त्याने आपला धावांचा वेग वाढवत नंतरच्या १८ चेंडूत ५० धावा केल्या.
आयपीएलच्या या हंगामात बटलरने भरपूर धावा करत ऑरेंज कॅपवर आपला हक्क कायम ठेवला आहे. त्याने १५ सामन्यात ७१८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर तो आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा सातवा फलंदाज आहे.
आतापर्यंत झालेल्या आयपीएल हंगामात एकाच हंगामात सर्वाधिक धावा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने २०१६च्या हंगामात ९७३ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचा विजय किती खास? चेन्नईनंतर अशी संधी फक्त आता गुजरातच्या वाट्याला आलीये
‘फ्लाइंग कौर’! हवेत झेपावत हरमनप्रीतने घेतला अप्रतिम झेल; Video भन्नाट व्हायरल
गुजरातच उचलणार आयपीएल ट्रॉफी? आकडेवारी देतायेत ग्वाही, तब्बल १० वेळा झालंय ‘असं’