क्रिकेट संघाचे चाहते नेहमीच पाकिस्तानविरुद्धच्या (INDvPAK) सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. अलीकडेच भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने खुलासा केला आहे की, आमच्या काळी असे म्हटले जायचे की तुम्ही केनियाकडून हरले तरी पाकिस्तानकडून हरू नका. कुंबळेच्या या विधानावरून भारत-पाकिस्तानमधील सामन्यांचे महत्त्व किती आहे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
आगामी आशिया कप 2023 मध्ये दोन्ही संघ आता लवकरच आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघाचा अष्टपैलू व उपकर्णधार हार्दिक पंड्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांदरम्यान खेळाडूंवर कोणत्या प्रकारचे दडपण असते याबद्दल सांगितले.
आशिया चषकाचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीशी बोलताना हार्दिक म्हणाला,
“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासोबत लोकांच्या अनेक भावना जोडल्या जातात. बाहेरच्या आवाजाकडे ध्यान न देता सामन्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. जर मी स्वतःबद्दल बोललो तर अशा सामन्यांमध्ये माझ्या भावना आणि उत्साहावर नियंत्रण कसे ठेवायचे हे मला चांगले माहित आहे. आम्ही इतर सामान्य सामन्यांप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या शंभर टक्के देऊन सामना जिंकतो.”
सध्या भारतीय संघ हार्दिकच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजमध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. तीन सामन्यानंतर भारतीय संघ मालिकेत 2-0 असा पिछाडीवर पडलेला दिसून येतो. या मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करणारा. त्यानंतर भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेला रवाना होईल. तेथे दोन सप्टेंबर रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
(Hardik Pandya Talk About India Pakistan Match In Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला मोकळीक! विना प्रशिक्षक खेळणार टी20 मालिका
WIvsIND । विराटचा ऐतिहासिक विक्रम मोडणारा ‘हा’ फलंदाज, टी-20 मालिकेनंतर यादीत होणार मोठा फेरबदल!




