आगामी टी20 विश्वचषकासाठी नुकतीच भारतीय संघाची निवड झाली. 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. या संघात अष्टपैलू हार्दिक पंड्या यालाही अपेक्षेप्रमाणे स्थान मिळाले. मागील काही काळापासून शानदार कामगिरी करत असलेल्या हार्दिककडून सर्वच भारतीय चाहते व माजी खेळाडूंना भरपूर अपेक्षा आहेत. भारताचे माजी कर्णधार व सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनीदेखील आता त्याच्याबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे.
सुनील गावसकर हे सातत्याने भारतीय संघाबद्दल आपली प्रतिक्रिया देत असतात. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गावसकर यांनी हार्दिकचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले,
“हार्दिकला मी विश्वचषकात ट्रंपकार्ड म्हणून पाहतोय. मला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. मला वाटते की हार्दिक तशीच कामगिरी करू शकतो, जी रवी शास्त्रीने 1985 वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये केली होती. फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. हार्दिक अशा ठिकाणी क्षेत्रक्षण करतो. ज्या ठिकाणावरून तो थेट धावबाद करू शकतो. हार्दिकने 1985 मधील रवीच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससारखी कामगिरी केल्यास आश्चर्य वाटायला नको.”
ऑस्ट्रेलियात 1985 मध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप आयोजित केली गेली होती. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत मालिकावीर म्हणून भारतीय अष्टपैलू रवी शास्त्री यांची निवड झालेली. त्यांनी पाच सामन्यात 182 धावा व 8 बळी मिळवले होते.
हार्दिक पंड्या हा आयपीएल 2022 पासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्याच नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलच्या विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका आपल्या नावे केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता धवन फक्त ‘बदली कर्णधार’ म्हणूनच संघात सामील होणार का?
रैना, इरफानने गायलेल्या गाण्यांवर युवीचा बेधुंद डान्स, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिले!
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”