भारत आणि इंग्लंड महिला संघात सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी, 24 सप्टेंबर रोजी खेळला गेला. भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना ठरला. महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम झुलनच्या नावावर आहे. झुलनच्या निरोपाच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामना सुरू होण्यापूर्वी दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिला खास सन्मान दिला गेला. यावेळी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला अश्रू अनावर झाल्याचे पाहिले गेले. कर्णधाराच्या रूपात हरमनप्रीतच्या मनात झुलनविषयी असलेला आदर या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसू शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला असून वेगाने व्हायरल देखील होत आहे.
झुलनच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तिने असे अनेक विक्रम केले आहेत, जे अध्याप कोणतीही दुसरी महिला क्रिकेटपटू मोडू शकली नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (महिला) तिच्या नावावर सर्वात जास्त 353 विकेट्सची आहे. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही तिच्या नावावर सर्वाधिक 253 विकेट्सची नोंद आहे. महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत देखील तिने इतरांपेक्षा सर्वात जास्त 43 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटके टाकण्याचा विक्रम देखील झुलनच्याच नावावर आहे.
Harmanpreet Kaur in tears for Jhulan Goswami's last match #ENGvIND | #ThankYouJhulan pic.twitter.com/I8no7MhBSq
— Pooja (Captain Healy) (@Alyssa_Healy77) September 24, 2022
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना झुलनने तीन वेळा आशिया चषक जिंकला आहे. तिने एकूण खेळलेल्या 12 कसोटी सामन्यांमध्ये 44 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या 203 सामन्यांमध्ये तिच्या नावावर 253 विकेट्स आहेत. तर खेळलेल्या एकूण 68 टी-20 सामन्यांमध्ये तिने एकूण 56 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला झुलनने एका गोष्टीची खंत व्यक्त केली. कारकिर्द जरी मोठी आणि चमकदार राहिली असली, तरी एकही आयसीसी विश्वचषक जिंकता आला नाही, याची खदखद मनात असल्याचे तिने स्वतः बोलून दाखवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘फिनिशींगचे काम डिकेचेच’, कॅप्टन रोहितचा सामन्यानंतर चकीत करणारा खुलासा
विराटच्या एका इशाऱ्यावर नागपूर स्टेडियम ‘गप-गार’, चाहत्यांच्या ‘या’ कृत्यामुळे भडकला माजी कर्णधार
INDvAUS: रोहितचा पहिलाच षटकार ठरला विक्रमी! आंतरराष्ट्रीय टी20मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय