इंग्लिश प्रीमियर लीगच्या (ईपीएल) तिसऱ्या आठवड्यात शनिवारी (२० ऑगस्ट) टोटेनहॅम हॉटस्पर विरुद्ध व्होल्व्ज यांच्यात सामना झाला. टोटेनहॅमने हा सामना १-० असा जिंकला आहे. या सामन्यात टोटेनहॅमचा स्टार स्ट्रायकर हॅरी केन याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम करताना त्याने मॅनचेस्टर सिटीचा सर्जियो ऍग्वेरो याला मागे टाकले आहे.
हॅरी केन (Harry Kane) याने व्होल्व्ज विरुद्धच्या सामन्यात ६४व्या मिनिटाला गोल केला. यामुळे त्याच्या ईपीएलमधील गोलची संख्या १८५ झाली आहे. हे सर्व गोल त्याने टोटेनहॅम हॉटस्पर (Tottenham Hotspur) संघाकडून खेळताना केले आहे. यामुळे इंग्लिश प्रीमियर लीगच्या इतिहासात एकाच क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम सर्जियो ऍग्वेरो (Sergio Aguero) याच्या नावावर होता. त्याने मॅनचेस्टर सिटीकडून खेळताना १८४ गोल केले आहेत.
Very proud to have broken @aguerosergiokun’s record of the most @premierleague goals for one club. Goes without saying that I couldn’t have done it without some amazing staff and teammates and unreal support along the way. I’m not done yet 💪 pic.twitter.com/bcFXdrLOAw
— Harry Kane (@HKane) August 20, 2022
व्होल्व्ज विरुद्ध सामना जिंकल्याने टोटेनहॅम लीगच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी मागील सामन्यात चेल्सी विरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत राखला. तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर अर्सेनलचे वर्चस्व आहे. अर्सेनलने शनिवारी बोर्नमाउथला ३-०ने पराभूत केले. त्यांनी या हंगामातील सलग तीन सामने जिंकले आहेत.
The most goals for one club in Premier League history ✨@HKane, take a bow 👏 pic.twitter.com/v7UG6EIzQ9
— Tottenham Hotspur (@SpursOfficial) August 20, 2022
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये एकाच क्लबकडून सर्वाधिक गोल करणारे खेळाडू
१८५* हॅरी केन (टोटेनहॅम हॉटस्पर)
१८४ सर्जिओ ऍग्वेरो (मॅनचेस्टर सिटी)
१८३ वेन रूनी (मॅनचेस्टर युनायटेड)
१७५ थेएरी हेनरी (अर्सेनल)
१४८ ऍलन शेरेर (न्यूकॅसल युनायटेड)
One hundred and eighty-five Premier League goals 💥
Fourth in the all-time Premier League goalscorer standings 👏 pic.twitter.com/tNQVWcrHkS
— Tottenham Hotspur (@SpursOfficial) August 20, 2022
हॅरीच्या टोटेनहॅममधील प्रवासाला १८ ऑगस्ट रोजी दहा वर्ष पूर्ण झाली. त्याने २००९मध्ये टोटेनहॅमसाठी पहिला सामना खेळला होता. आता त्याने २८२ सामन्यात एकाच क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याची कामगिरी केली आहे.
या लीगमधील टोटेनहॅमचा पुढील सामना रविवारी (२८ ऑगस्ट) नॉटम फॉरेस्ट विरुद्ध आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लवकर बाद झाल्यानंतर राहुल थेट…’, भारताच्या माजी दिग्गजाने केला मोठा खुलासा
‘तुमच्या मध्ये माझं नाव कशाला?’ मोहम्मद आमीरने नेटकऱ्यांना विचारला खोचक सवाल
एशिया कप: टीम इंडियाकडून झाली मोठी चूक! ‘या’ मॅच विनरला संघात न घेण्याचा निर्णय येईल अंगलट