नुकत्याच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १६९ धावांचा स्कोर उभारला. प्रत्युत्तरात चेन्नईने २० षटकात फक्त १३२ धावा केल्या आणि हंगामातील ५वा सामना गमावला. त्यामुळे चेन्नईच्या कमजोर फलंदाजीला पाहता, क्रिकेट विशेषज्ञ आणि समालोचक हर्षा भोगले यांनी संघाला खूप चांगला पर्याय सांगितला आहे.
भोगले यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत लिहिले की, “यावर्षीचा मिड सिजन ट्रान्सफर नियमबाबतचा माझा विचार तुम्हाला कसा वाटतो. चेन्नईला एका प्रतिभाशाली वरच्या फळीतील फलंदाजाची आवश्यकता आहे. अजिंक्य रहाणेलाही आयपीएल सामना खेळायचा आहे. पण त्याला जास्त संधी मिळत नाहीये.”
थोडक्यात सांगायचं झालं तर, भोगले यांनी चेन्नईला मिड सीजन ट्रान्सफरमध्ये रहाणेला संघात घेण्याचा सल्ला दिला आहे.
२०१८-१९मध्ये रहाणे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. त्यानंतर आयपीएल २०२० लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला विकत घेतले. मात्र या अनुभवी खेळाडूला आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये फक्त १ सामना खेळायला मिळाला आहे. असे असले तरी, दिल्ली संघ मिड सीजन ट्रान्सफरमध्ये रहाणेला सोडण्याच्या विचारात दिसत नाही.
How's this for a mid-season transfer thought: #CSK desperately need a quality top order batsman. Ajinkya Rahane desperately needs a game. Ajinkya Rahane is not getting a game. #MidnightThoughts.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 10, 2020
३२ वर्षीय अजिंक्य रहाणे हा सलामीवीर फलंदाज आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने १४१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३२.७८च्या सरासरीने ३८३५ धावा केल्या आहेत. यात २ शतके आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-राजस्थानच्या विजयानंतर तेवतिया आणि खलीलमध्ये चांगलीच जुंपली; पुढे काय झाले पाहाच
-तेवतिया आणि राजस्थान संघाच नातं आहे खूपच खास, असं आम्ही नाही आकडेवारी सांगतेय
-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ