इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे.या सामन्यातील पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट ) एकीकडे खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू होते. तर दुसरीकडे इंग्लंडच्या खेळाडूने मन जिंकणारे कृत्य केले आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी ताबडतोड फलंदाजी करून इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढला आहे. या दरम्यान इंग्लंड संघातील खेळाडू आणि जसप्रीत बुमराह या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले होते.
पण याच दरम्यान इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज हसीब हमीदने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी हसीब हमीदला जसप्रीत बुमराहची शू लेस बांधताना पाहिले गेले होते. हमीदच्या या कृत्याचे सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केले जात आहे.(Haseeb hameed ties Jasprit bumrahs shoeless photo went viral on social media)
भारतीय संघाने २९८ धावांवर डाव केला घोषित
भारतीय संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर ५ व्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी मिळून भारतीय संघाला २९८ धावांपर्यंत पोहचवले आहे. मोहम्मद शमी नाबाद ५६ धावांची खेळी केली, तर जसप्रीत बुमराह नाबाद ३४ धावांची खेळी केली.
भारतीय संघाने या सामन्यात २७१ धावांची आघाडी घेतली. या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ६१ तर चेतेश्वर पुजाराने ४५ धावांचे योगदान दिले होते. इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: बुमराहला भिडली इंग्लंडची टीम, मग काय कर्णधार कोहलीने लॉर्ड्सच्या गॅलरीतूनच केली शिवागाळ
एकटाच पुरेसा! इंग्लंडच्या खेळाडूंचा बुमराहशी पंगा, मग काय एकट्यानेच सगळ्यांना शिकवला धडा





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा