विश्वचषक 2023 अफगाणिस्तानसाठी स्वप्नवत राहिला आहे. अफगाणिस्तानने शुक्रवारी (3 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 च्या 34व्या सामन्यात नेदरलँड्सचा 7 गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या.
लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ 46.3 षटकात 179 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 31.3 षटकांत तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.
अफगाणिस्तानचा कर्णधार हश्मतुल्ला शहीदीने सामन्यानंतर सांगितले की, त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांच्या कामगिरीने मी खूप खूश आहे. तो म्हणाला, “मी म्हणू शकतो की, आम्ही दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली. आम्ही चांगली गोलंदाजी केली, धावांचा पाठलागही चांगला केला. सलग तिसऱ्यांदा आम्ही लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. आमचे लक्ष धावफलक आणि विरोधी संघाच्या गोलवर होते. आम्ही परिस्थितीनुसार खेळलो आणि आमच्या संघासाठी पराक्रम गाजवला.”
हश्मतुल्ला शहीदी (Hashmatullah Shahidi) पुढे म्हणाला, “मोहम्मद नबी (Mohammad Nabi) हा खास खेळाडू आहे. त्याने नेहमीच आपली प्रतिभा दाखवली आहे. जेव्हा संघाला त्याची गरज असते तेव्हा तो जबाबदारी उचलतो, हे त्याने या सामन्यात दाखवून दिले. या विश्वचषकात आपण सर्व एकजुटीने खेळत आहोत. आम्ही आमच्या विजयाचा आनंद घेत आहोत आणि प्रत्येकजण जिंकण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे.”
उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांबद्दल बोलताना शाहिदी म्हणाला, “आम्ही उपांत्य फेरी गाठण्याचे 100 टक्के स्वप्न पाहत आहोत. अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि तसे झाल्यास ती आपल्या देशासाठी मोठी उपलब्धी असेल. तीन महिन्यांपूर्वी मी माझी आई गमावली आणि माझे कुटुंब खूप दु:खात आहे. उपांत्य फेरी गाठणे ही मोठी कामगिरी असेल.”
अफगाणिस्तानचा कर्णधार पुढे म्हणाला, “यावेळी अनेक निर्वासित लोक संघर्ष करत आहेत. आम्ही त्याचे व्हिडिओ पाहतो आणि आम्हाला त्यांच्याबद्दल वाईट वाटते. या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मला हा विजय त्यांना समर्पित करायचा आहे जे दुःखात आणि घरी आहेत.”
अफगानिस्तानला विश्वचषकातील पुढील सामना 7 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळायचा आहे. अफगानिस्तानने या विश्वचषकात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत त्यातील 4 सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे. 8 गुणांसह गुणतालिकेत ते 5व्या स्थानावर आहेत. (Hashmatullah Shaheed victory over Netherlands is dedicated to This also made a big statement about the semi final)
म्हत्वाच्या बातम्या
“हा मूर्खपणा करून तुम्ही आमचीही लाज काढताय”, अक्रमने पाकिस्तानी दिग्गजाला चांगलंच झापलं
CWC 2023: निर्णायक सामन्यात पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, केन विलियम्सनचे पुनरागमन