भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांची कासोटी मालिका खेळली जात आहे. त्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामन्यांचे आयोजन यूएईत केले गेले आहे. त्याच्यानंतर तिथेच टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय संघात टी-२० विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाते? हे पाहण्यासारखे असणार आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू हार्दिक पंड्या मागच्या काही काळापासून जास्त गोलंदाजी करू शकला नाही. अशात त्याला टी-२० विश्वचषकासाठी संधी भेटते की नाही? हे पाहावे लागेल.
भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे होते. ते टी-२० विश्वचषकासाठी हार्दिक पंड्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत. म्हाम्ब्रेने इंडिया-ए साठी गोलंदाजी प्रशिक्षकाचे काम केले आहे. तो बंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही गोलंदाजी प्रशिक्षक आहे. पंड्या आणि अन्य भारतीय खेळाडू याच ठिकाणी दुखापतीवर इलाज करत आहेत.
म्हाम्बेने म्हटले आहे की, “आयपीएलनंतर लगेच ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अनुषंगाने पंड्याच्या गोलंदाजीचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. हार्दिकसोबत आम्ही हळू-हळू पुढे जात आहोत. मी त्याला षटकांच्या संख्येच्या बाबतीत दबाव नाही देत. त्याच्यावर खुप नजर ठेवली जात आहे की, आम्ही त्याला किती पूश करू शकतो. आम्हाला हळूहळू त्याच्यात प्रगती करावी लागेल. तो संघासाठी खूप महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो, हे लक्षात घेऊन त्याच्या गोलंदाजीचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.”
म्हाम्ब्रेने आयएएनएसशी बोलताना सांगितले की, “आम्हाला त्याची फलंदाजी माहित आहे. पण, आपण त्यात गोलंदाजी जोडली तर तो एक वेगळ्याच पातळीवर जाऊ शकतो. या अनुषंगाने आम्ही त्याच्या गोलंदाजीवर काम करत आहेत. कंडीशनिंग विभाग आणि फिजिओ असा प्रत्येक जण त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. आमच्यात त्याच्या गोलंदाजीबद्दल चर्चाही झाली आहे. मुळात त्याची आयपीएलमधील गोलंदाजी कामगिरी टी-२० विश्वचषकात त्याचे स्थान निश्चित करेल.”
मागच्या काही महिन्यांपासून पाठीच्या त्रासामुळे या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी करताना अडचण येत आहे. याच कारणामुळे तो भारताच्या कसोटी संघात सहभागी होऊ शकला नाही. मात्र, त्याने श्रीलंकेच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात गोलंदाजी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझ्या जागी अशा खेळाडूला खेळताना पाहूच शकत नव्हतो, ज्याला मी क्लब संघातही जागा दिली नसती’
‘…म्हणून आताचे गोलंदाज १५०-१६० च्या वेगाने गोलंदाजी करू शकत नाहीत,’ स्पीड मास्टरने सांगितले कारण
रक्षाबंधन विशेष: तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिणींबरोबरच पाहा गोड फोटो