पुणे, दि.25 ऑगस्ट 2023- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत क्वालिफायर १ लढतीत हॉक्स संघाने रेव्हन्स संघाचा 4-1(229-187) असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हॉक्स संघाकडून तन्मय आगाशे, मिहिर विंझे, निखिल चितळे, गिरीश खिंवसरा, आनंद शहा, स्वरूप कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, अक्षय ओक यांनी विजयी कामगिरी केली.
एलिमिनेटर १ लढतीत ईगल्स संघाने कॉमेट्स संघावर 4-3(247-242) असा विजय मिळवला. विजयी संघाकडून जयदीप गोखले, कर्ण मेहता, चिन्मय चिरपुटकर, संजय परांडे, प्रशांत वैद्य, जयदीप कुंटे यांनी सुरेख कामगिरी केली. एलिमिनेटर २ लढत ईगल्स व रेव्हन्स यांच्यात होणार असून यातील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
क्वालिफायर १: हॉक्स वि.वि.रेव्हन्स 4-1(229-187) (गोल्ड खुला दुहेरी 1: राधिका इंगळहळीकर/नीलेश केळकर पराभुत वि.केदार नाडगोंडे/तेजस चितळे 15-21, 10-21; गोल्ड खुला दुहेरी 2: तन्मय आगाशे/मिहिर विंझे वि.वि.बिपिन चोभे/अमोल मेहेंदळे 21-08, 21-10; खुला दुहेरी 3: निखिल चितळे/गिरीश खिंवसरा वि.वि. विनित रुकारी/हर्षद जोगाईकर 20-21, 21-06, 15-12; खुला दुहेरी 4: आनंद शहा/स्वरूप कुलकर्णी वि.वि.गिरीश मुजुमदार/मंदार विंझे 21-11, 20-21, 15-8; मिश्र दुहेरी 5: गौरी कुलकर्णी/अक्षय ओक वि.वि.प्रांजली नाडगोंडे/तन्मय चितळे 14-21, 21-14, 15-14):
एलिमिनेटर १: ईगल्स वि.वि.कॉमेट्स 4-3(247-242) (गोल्ड खुला दुहेरी 1: सुधांशू मेडसीकर/अमित देवधर पराभुत वि.प्रतिक धर्माधिकारी/पराग चोपडा 17-21, 18-21; गोल्ड खुला दुहेरी 2: सिद्धार्थ साठ्ये/संग्राम पाटील पराभुत वि.तन्मय चोभे/अदिती रोडे 08-21, 14-21; खुला दुहेरी 3: जयदीप गोखले/कर्ण मेहता वि.वि.निखिल कानिटकर/शिवकुमार जावडेकर 21-09, 21-06; खुला दुहेरी 4: चिन्मय चिरपुटकर/संजय परांडे वि.वि.संजय फेरवानी/आनंद घाटे 17-21, 21-13, 15-10; मिश्र दुहेरी 5: बाळ कुलकर्णी/संध्या भट पराभुत वि.आनंदिता गोडबोले/पार्थ केळकर 16-21, 09-21; खुला दुहेरी 6: प्रशांत वैद्य/जयदीप कुंटे वि.वि.सचिन जोशी/हेमंत पालांडे 15-10, 10-15, 15-09; खुला दुहेरी 7: यश मेहेंदळे/संदीप साठे वि.वि.रोहित साठे/विनित राठी 15-11, 15-12)
महत्वाच्या बातम्या –
आशियाई क्रीडा स्पर्धेकरीता महाराष्ट्राच्या २ पुरुष आणि २ महिला खेळाडूंना भारतीय कबड्डी संघात संधी
वनडे मालिकेत यजमान अफगाणिस्तानला क्लीन स्वीप, पाकिस्तानने जिंकला सलग तिसरा वनडे सामना