आयपीएल व बीबीएलमध्ये शतक केलेले ते आहेत जगातील केवळ ३ खेळाडू

जगभरात जेव्हा टी२० लीगचं नाव घेतलं जातं, तेव्हा डोळ्यासमोर फक्त २ नावे येतात. ती म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आणि बिग बॅश लीग होय. या २ लीगचं नाव येण्याचं कारण म्हणजे त्यांची प्रसिद्धी आणि प्रेक्षकांपर्यंतची पोहोच. यामधील एक लीग ही भारतीय आहे. तर दुसरी लीग ही ऑस्ट्रेलियन आहे.

या दोन्हीही लीगमध्ये उत्कृष्ट क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तसेच जेव्हा मनोरंजनाचा भाग येतो तेव्हा या दोन्ही लीग एकमेकांच्या बरोबरीचा असतात असं म्हणणं चूकीचे ठरणार नाही.

टी२० क्रिकेटमध्ये शतक करणे दुर्लभ दृश्य नाही परंतु अशी कामगिरी करणेही सोपे नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (टी२० क्रिकेट) १०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी क्रिकेटपटूला खास काहीतरी करावे लागते. तसेच जगातील या दोन मोठ्या टी२० फ्रंचायझी लीगमध्ये (T20 Franchise League) एकाच खेळाडूने शतक करणे त्याहून अवघड.

आयपीएल आणि बीबीएलमध्ये शतकांचा पाऊस पाडणारे ३ खेळाडू-

१. शेन वॉट्सन-

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सन (Shane Watson) टी२० क्रिकेटमधील एक प्रभावी क्रिकेटपटू ठरला आहे. वॉट्सनने आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामातच विजेतेपद मिळवून दिले होते. याव्यतिरिक्त वॉट्सनने २०१५मध्ये सिडनी थंडर्सला (Sydney Thunders) बीबीएल ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवून दिले होते.

वॉट्सनने २०१९मध्ये सिडनी थंडर्सकडून खेळताना ब्रिसबेन हीटविरुद्ध अवघ्या ६२ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. याबरोबरच त्याने बीबीएलमधील आपले पहिले शतक साजरे केले होते.

याव्यतिरिक्त त्याने आयपीएल कारकीर्दीत ४वेळा १००पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यातील एक म्हणजे आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना त्याने सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध केवळ ५७ चेंडूत ११७ धावा केल्या होत्या. सामनावीर वॉट्सनच्या या खेळीमुळे चेन्नईला आयपीएलचे तिसरे विजेतेपद हे २०१८मध्ये मिळाले.

२. ख्रिस गेल-

जमैकामध्ये जन्मलेला ख्रिस गेल (Chris Gayle) वेस्ट इंडीज संघाकडून क्रिकेट खेळतो. आयपीएल इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या गेलच्या नावावर आहेत. त्याने २०१३ मध्ये पुणे वॉसियर्स इंडियाविरुद्ध खेळताना नाबाद १७५ धावा केल्या होत्या.

गेलला आतापर्यंत टी२० सामना खेळणारा सर्वात धडाकेबाज फलंदाज असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर त्याला ‘गेल वादळ’ (GayleवStrom) असेही म्हटले जाते.

गेलने आपल्या कारकीर्दीत उत्कृष्ट फलंदाजी केल्यामुळे त्याला ‘युनिव्हर्स बॉस’ (Universe Boss) हे टोपणनाव पडले आहे. गेलच्या दमदार फलंदाजीचे साक्षीदार होणे भारतातील तसेच ऑस्ट्रेलियामधील चाहत्यांचे भाग्य आहे.

आयपीएलमध्ये (IPL) तसेच बीबीएलमध्ये (BBL) आतापर्यंत शतकी खेळी करण्याचे भाग्य गेलला लाभले आहे. त्याने बीबीएलमधील पहिले शतक हे २०११मध्ये केले होते. त्यावेळी गेलने सिडनी थंडर्सकडून (Sydney Thunders) खेळताना ऍडलेड स्ट्राईकर्सविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती.

आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा वेळा १०० पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी गेलने केली आहे. हे आयपीएल इतिहासात कोणत्याही खेळाडू केलेल्या कामगिरीच्या तुलनेत अधिक आहे.

३. डेव्हिड वॉर्नर-

डेव्हिड वॉर्नरने आपल्या नेतृत्वात आयपीएल २०१६ चे विजेतेपद हैद्राबादला मिळवून दिले आहे.

बीबीएलच्या इतिहासात सर्वप्रथम 100 धावा करणाऱ्या वॉर्नरशिवाय (David Warner) दुसरा कोणीही पुरुष क्रिकेटपटू नव्हता. वॉर्नरने ५१  चेंडूंत १०२ धावा फटकावत सिडनी थंडरला मेलबर्न स्टार्सच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात मोलाचे योगदान दिले होते.

याबरोबरच वॉर्नरने आयपीएलमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. हैद्राबादमध्ये वॉर्नरला मोठा चाहतावर्ग आहे. हैद्राबाद हे सनरायझर्स हैद्राबादचे (Sunrisers Hyderabad) घरचे मैदान आहे

हैदराबाद संघातील वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ४ शतके केली आहेत. ज्यामुळे तो आयपीएल इतिहासात एक मोठा फलंदाज ठरला आहे. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या मदतीने सनरायजर्स हैद्राबादने २०१६मध्ये विजेतेपद पटकाविले.

ट्रेंडिंग घडामोडी-

-सीएसके आणि आरसीबीमधील फरक त्याने सांगितला, याचमुळे आरसीबी जिंकत नाही आयपीएल

-या क्रिकेटरने सांगितले, कोरोना व्हायरसमुळे त्याला झालेले फायदे

-श्रेयस अय्यरला आवडतात हे ५ क्रिकेटर्स

You might also like