शनिवारी (13 मे) आयपीएलच्या 16व्या हंगामातील 58वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यायंच्यात झाला. पाहुण्या लखनऊने या सामन्यात यजमान हैदराबादला 7 विकेट्सने पराभूत केले. विजय मिळवण्यासाठी लखनऊला शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले आणि चाहत्यांचे चांगले मनोरंजन देखील झाले. मात्र, याच चाहत्यांचे वर्तन हैदराबादचा हेनरिक क्लासेन याला पटले नाही. सोबतच पंचांच्या एका निर्णायवर नाराजी व्यक्त करणे क्लासेनला महागात पडले आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चढाओढ दिसली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सने 19.2 षटकांमध्येच 3 बाद 185 धावा कुटल्या आणि विजय मिळवला. हैदराबादसाठी हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) सर्वत मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. त्याने 29 चेंडूत 47 धावा केल्या. असे असले तरी, हैदराबादच्या फलंदाजीनंतर त्याने मैदानत उफस्थित चाहते आणि पंचांविषयी नाराजी व्यक्त केली.
हैदराबादच्या फलंदाजीवेळी 19व्या षटकात नो बॉलचा वाद पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांनी षटकातील तिसरा चेंडू नो बॉल नाही असे सांगितले. पण या निर्णयाशी स्वतः क्लासेन आणि उपस्थित हैदराबादचे चाहते सहमत नव्हते. याच पार्श्वभूमीवर त्याने हैदराबादची फलंदाजी संपल्यानंतर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “हे निराशाजनक आहे. घरच्या मैदानावर चाहत्यांकडून अशा अपेक्षा नव्हत्या. यामुळे फलंदाजांची लय देखील बिघडली. सोबत पंचांचे काम देखील अपेक्षित नव्हते.” बोलताना शेवटच्या वाक्यात क्लासेनने पंचांविषयी नाराजी व्यक्त केली आणि नेमकी हीज गोष्ट त्याला महागात पडली. आयसीसीने क्लासेनकडून सामना शुल्काच्या 10 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली आहे. त्याने आयपीएलच्या आचर संहितेचे उल्लंघन केल्याचे सांगितले गेले आहे.
क्लासेन चाहत्यांवर नाराज कशामुळे?
दरम्यान, या नो बॉल वादानंतर स्टॅन्डमधील उपस्थित हैदराबादचे चाहते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काहींनी स्टॅन्डमधील नट-बोल्ड काढून लखनऊच्या डकआउटकडे फेकल्याचा प्रकार गंभीर होता. याच कारणास्तव सामना काही मिनिटांसाठी थांबवावा देखील लागला. एवढेच नाही, चाहत्यांना लखनऊ संघाला डिवचण्यासाठी विराट… विराट अशा घोषणाही दिल्या. 1 मे रोजी विराट कोहलीने गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्याशी वाद घातला होता. याच पार्श्वभूमीवर या सामन्यात देखील विराटचे नाव पुन्हा चर्चेच राहिले. या सर्व गैरप्रकारामुळेच क्लासेनने चाहत्यांविषयी नाराजी व्यक्त केली. (Heinrich Klaasen has been fined 10% of match fees for breaching the IPL code of conduct.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वन मॅन शो! संघ अडचणीत असताना प्रभसिमरन सिंगने ठोकले आपले पहिले आयपीएल शतक
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही शतक नाही अन् दोन वर्षांसाठी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड